Tokyo Olympic : ‘या’ टेबल टेनिसपटूवर टिप्पणी केल्याबाबत ग्रीक टीव्ही कॉमेंटेटरचे निलंबन

Tokyo Olympic : ‘या’ टेबल टेनिसपटूवर टिप्पणी केल्याबाबत ग्रीक टीव्ही कॉमेंटेटरचे निलंबन

Tokyo Olympics: Greek TV commentator fired for commenting on 'this' table tennis player

टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका दक्षिण कोरियन टेबल टेनिस खेळाडूबद्दल ऑन-एअर टिप्पणी करणाऱ्या ग्रीसमधील एका क्रीडा पत्रकाराला कामावरून निलंबित करण्यात आले. या क्रीडा पत्रकाराने खेळाडूला वर्णद्वेषी म्हणून संबोधले आहे, असे देशाच्या सरकारी प्रसारकाने मंगळवारी सांगितले.

ERT टेलिव्हिजनने म्हटले आहे की, पुरुष गटाच्या टेबल टेनिसमध्ये जेओउंग यंग-सिकने ग्रीसच्या पॅनाजिओटिस जिओनिसला हरवल्यानंतर क्रीडा पत्रकार डिमोस्थेनिस कार्मिरिस यांनी On- Air वर्णद्वेषीवर टिप्पणी केली. वर्णद्वेषी टिप्पण्यांनंतर टीकाकार डिमोस्थेनिस कार्मिरिस यांच्याबरोबरचे सहकार्य म्हणजेच collaberation संपवण्यात आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियन टेबल टेनिसपटूंच्या कौशल्याबद्दल विचारले असता कार्मिरिस म्हणाले की, “त्यांचे डोळे अरुंद आहेत ज्यामुळे त्यांना चेंडू पुढे किंवा मागे जाताना कसा दिसू शकेल हे मला समजत नाही.”

या टिप्पणींनंतर कित्येक तासांनी ERT ने आपल्या वेबसाइटवर एक निवेदन पोस्ट केलं. ईआरटीने निवेदनात म्हटले आहे की, “सार्वजनिक दूरचित्रवाणीवर वर्णद्वेषी टिप्पण्यांना स्थान नाही. “ईआरटी आणि डिमोस्थेनिस कार्मिरिस यांच्यातील सहकार्य आज सकाळच्या कार्यक्रमानंतर लगेचच संपुष्टात आले आहेत.”

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत