पाणी दूषित होत असल्याने आरोग्य विभागाने पाणी नमुने तपासून घ्यावे – जि. प. सदस्य पांडुरंग थडके

पाणी दूषित होत असल्याने आरोग्य विभागाने पाणी नमुने तपासून घ्यावे – जि. प. सदस्य पांडुरंग थडके

The health department should check the water samples as the water is getting contaminated - Distt. P. Member Pandurang Thadke

प्राथमिक आरोग्य केंद्र जातेगाव येथे ता. वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

  • गेवराई प्रतिनिधी आरोग्य विभागाने पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येक गावात जाऊन पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी, आरोग्य सेवा वेळेवर द्याव्यात अशा सूचना प्राथमिक आरोग्य केंद्र जातेगाव येथे आढावा बैठक प्रसंगी जि. प. सदस्य पांडुरंग थडके यांनी दिल्या. यावेळी जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जि. प. सदस्य पांडुरंग थडके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, डॉ. प्रकाश फड, डॉ. पल्लवी झोडपे, प. स. सदस्य सिद्धार्थ नरवडे, सरपंच सतीश चव्हाण, रुग्ण कल्याण समिती सदस्य गोपाल भैय्या चव्हाण, आरोग्य रुग्ण कल्याण समिती सदस्य देवराज कोळे, ग्रा. प. सदस्य राजाराम यमगर उपस्थित होते. बैठकी प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थान शौचालय दुरुस्ती, औषध पुरवठा, नविन ॲम्बुलन्स, यास रिक्त पदे विषयावर चर्चा करण्यात आली. जि. प. सदस्य पांडुरंग थडके बोलताना म्हणाले की, ‘गोदाकाठचा भागातील गावांना आरोग्य कर्मचारी यांनी भेट देऊन पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी, वेळेवर रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वीज पुरवठा व इतर समस्या तात्काळ सोडवण्यात येतील’. डॉ कदम यांनी बोलताना सांगितले की, ‘रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन गावकर्यात जनजागृती करून नागरिकांना वेळेवर लसीकरण करून घ्यावे, अटीजन टेस्ट करून घ्यावी’. यावेळी ढाकरगे (क्लर्क), चाटे सिस्टर, गणेश जवळकर, रोड मॅडम, शिपाई आयुब पठाण, शरद बनसोडे आदी उपस्थित होते. रुग्ण कल्याण समितीच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम साहेब यांचे विशेष कौतुक करून सत्कार करण्यात आला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत