चिपळूणमध्ये भयानक पूर; अनेक घरे-वाहने पाण्याखाली

चिपळूणमध्ये भयानक पूर; अनेक घरे-वाहने पाण्याखाली

Terrible floods in Chiplun; Many houses and vehicles are under water

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता रौद्ररूप धारण केल्याचं पहायला मिळत आहे. कोकणात (Heavy rain in Konkan) परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात (Chiplun City) पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला (Vashisht River) पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे.

WhatsApp Image 2021 07 22 at 1.19.23 PM 1
chiplun flood
WhatsApp Image 2021 07 22 at 1.19.24 PM 1

शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी (rain water in houses) शिरल्याचं पहायला मिळत आहे.अनेक घरे पाण्याखाली गेले आहेत. घरांसह इमारतींचे तळमजले हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पहायला मिळत आहे. चिपळुण मध्ये जाण्याचे सगळे मार्ग बंद असल्याने मदतीचे मार्गही बंद झाले आहेत.

WhatsApp Image 2021 07 22 at 1.19.24 PM

WhatsApp Image 2021 07 22 at 1.19.23 PM

२००५ नंतर प्रथमच अशा प्रकारे चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असल्याचं दिसून येत आहे. निसर्गरम्य मानल्या जाणाऱ्या कोकणामध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातील अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

WhatsApp Image 2021 07 22 at 1.19.22 PM 1
WhatsApp Image 2021 07 22 at 1.19.22 PM

बचाव पथक नागरिकांना वाचवण्यासाठी आणि घटनास्थळातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोकणात परिस्थिती चिंताजनक झाली असून अनेक शहरांत पाणी शिरले आहे. चिपळूण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ट नदीला पूर आल्याने संपूर्ण पाणी शहरात शिरले आहे. शहरातली सर्व दुकाने, तसेच घरांत पाणी शिरल्याचं पहायला मिळत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत