#StayHomeStaySafe : कोरोनामुळे घरी राहून कंटाळला असलात तर करा या गोष्टी

#StayHomeStaySafe : कोरोनामुळे घरी राहून कंटाळला असलात तर करा या गोष्टी

कोरोना व्हायरसच्या कहरामुळे सध्या बहुतेक सगळ्या कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमची सक्ती करण्यात आली आहे किंवा 50 टक्के स्टाफला ऑफिसला बोलावण्यात येत आहे. यामुळे बहुतेक सगळ्यांनाच नाईलाजास्तव घरीच राहावं लागत आहे. कारण कोरोनामुळे कुठे बाहेर जाणंही शक्य नाही. अशावेळी तुम्ही घरी काम करण्यासोबतच मधल्या वेळात कंटाळा घालवण्यासाठी काय काय करू शकता याबाबतचा विचार केला POPxoMarathi ने. कारण POPxo Team सुद्धा घरातूनच काम करत आहे. त्यामुळे सारखं घरी राहिल्यामुळे कंटाळा आल्यास तुम्हीही खालील गोष्टी करून पाहा. नक्कीच कंटाळा दूर होईल.

वाचाल तर वाचाल

आजकाल रोजच्या धावपळीत आपल्याला वाचनाला फारसा वेळ मिळतच नाही. मग कोरोनाच्या संकटकाळातही चांगली गोष्ट ही की, तुम्हाला आता वाचनासाठी वेळ देता येईल. कारण आजकाल तर साधं वर्तमानपत्रही वाचलं जात नाही. आता घरी आहात आणि वेळही आहे तर बऱ्याच दिवसांपासून वाचायचं राहिलेलं एखादं पुस्तक वाचा. नक्कीच छान वाटेल. अभिनेत्री खूशबू तावडेनेही इन्स्टावर तिचा आवडतं पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला होता. तुमचं आवडतं पुस्तक कोणतं आहे?

फिटनेस फर्स्ट

कोरोनाला टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रतिकारशक्ती चांगली असणे. मग जिमला जाणं शक्य नसलं म्हणून काय झालं घरच्या घरी व्यायाम करायला काय हरकत आहे. अगदी सोपे व्यायामप्रकार तुम्ही घरच्या घरी करू शकता. पाहा POPxo च्या एकता अलरेजाने शेअर केलेला हा व्हिडिओ.

तसंच फिटनेससाठीचा व्यायाम तुम्ही जोडीदारासोबतही करू शकता. मराठी अभिनेता सिद्धार्थ मेनन त्याच्या बायकोसोबतचा शेअर केलेला हा वर्कआऊट व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झाला आहे. असा वर्कआऊट केल्यास तुम्हाला एकमेकांसोबत वेळही घालवता येईल. अगदीच असं शक्य नसेल तर सोपा प्रकार म्हणजे योगा मॅटचा वापर करा आणि योगसाधना करा अभिनेत्री शिल्पा शेट्टीप्रमाणे.

स्वतःला आणि कुटुंबाला वेळ द्या

स्वतःला वेळ देणंही महत्त्वाचं आहे आणि कुटुंबालासुद्धा. जो आपल्या बिझी शेड्युलमध्ये मिळत नसतो. मग घरच्यांना वेळ द्या. कारण मुलांच्याही शाळांना सुट्टी आहेच. घरच्या घरी सगळ्यांसोबत किंवा स्वतःचं एखादं छान फोटोशूट करा. तुमचा एखादा छंद जसं पेटींग किंवा कविता करणं याला वेळ द्या. तुमच्यातील क्रिएटीव्हीटीला या निमित्ताने नक्कीच वाव मिळेल आणि समाधानही वाटेल. मुलांसोबत मस्ती करा. त्यांच्यासोबत घरातल्या घरात एखादा खेळ खेळा.

किचनची सफर

बरेचदा आपल्याला एखादा पदार्थ स्वतः करून खाण्याची इच्छा होते. पण गाडी पकडायची घाई आणि मस्टरचं टेन्शन यामुळे किचनमध्ये जास्त वेळ घालवताच येत नाही. किंबहुना आवडता पदार्थ करायचा राहूनच जातो. मग आता ना गाडी पकडायचं टेन्शन ना पंच इनचं टेन्शन. निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही किचनमध्ये जाऊन छान बेत केल्याची पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. तुमच्यातील शेफलाही करू द्या किचनची सफर. तसंही सध्या जास्तीत जास्त घरातलं खाणंच चांगलं आहे.

पेट फ्रेंड्स

वीकेंड्सना पार्टीला किंवा पिकनिकला गेल्यावर आपल्या मित्रांसोबत आपण वेळ घालवतो. पण आपल्या घरातल्या सदस्याला म्हणजेच लाडक्या पेटला वेळ देण्याची तुम्हाला संधी आहे. त्यांच्यासोबतही छान वेळ घालवा. त्यांचे लाड करा. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेप्रमाणे आपल्या आवडत्या डॉगीला वेळ द्या.

सेल्फ पँपर

आता या वीकेंडला काही तुम्हाला आवडत्या पार्लरला जाता येणार नाही. मग काय घरच्या घरी करा सेल्फ पँपरिग सेशन. अभिनेत्री दीपिकानेही तिच्या सोशल मीडियावर खालील फोटो शेअर करत तिचं ब्युटी रेजिम दाखवलं आहे. मग तुम्हीही छान फेसपॅक लावा आणि सेल्फ पँपर करा.

सो अशाप्रकारे तुम्हीही घरात राहण्याचा हा सक्तीचा काळ सुखकर करू शकता. वर न सांगण्यात आलेले अजूनही वेळ घालवण्याचे प्रकार म्हणजे वॉर्डरोब आवरा, घरातील अरेंजमेंट चेंज करून पाहा, एखाद्याला जुन्या मैत्रिणीशी फोन करून गप्पा मारा किंवा जुने अल्बम काढून जुन्या आठवणींना उजाळा द्या. शेवटी हाती आलेला वेळ सत्कारणी लावणं महत्त्वाचं आहे. सतत बातम्या बघून मनातली भीती वाढवण्यापेक्षा हे कधीही चांगलंच नाही का…मग #stayhomestaysafe 

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत