SSC Result । दहावी परीक्षेत ९९. ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

SSC Result । दहावी परीक्षेत ९९. ९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

SSC Result | In10th examination 99. 95 percent of students passed

महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. आज १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे आपला निकाल पाहायला मिळणार आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी एक वाजता पाहता येणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे. तसेच 99.95 टक्के विद्यार्थी एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

cbse exam 13795fc4 6215 11ea bf5c d064e47554d2 1626342795542

यामध्ये नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे तर कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती मिळत आहे. 22, 383 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 82, 362 विद्यार्थ्यांना 90 टक्के तर 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी परीक्षेत बसले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना गुण देण्यात आले होते. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत