श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था-उरण तर्फे जाहिर मदतीचे आवाहन

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था-उरण तर्फे जाहिर मदतीचे आवाहन

Shri Chhatrapati Shivaji Maharaj Social Organization- Uran calls for help

– विठ्ठल ममताबादे

सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पूर आलेले आहे. या पुरात अनेक संसार, घरे, शेती उध्वस्त झाले आहेत. या गरजू, पीडित लोकांना मदतीची गरज आहे. शासन आपल्या परीने मदत करत आहे. पण एक माणुसकी व आपल्याच जिल्ह्यातील बांधव म्हणून संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना मदत करणे आपले आद्य कर्तव्य बनते. त्या दृष्टी कोनातून रायगड जिल्ह्यातील महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था-उरणच्या माध्यमातून विविध जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याचे कार्य चालू आहे.सदर जीवनावश्यक वस्तू रायगड जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्या कडे सुपूर्द करण्यात येणार आहे. सदर मदत सोमवार दि 26 जुलै सकाळी 9 पर्यंत स्वीकारली जाणार आहे.तरी ज्यां मान्यवरांना मदत करायची त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधावे.

जीवनावश्यक वस्तू :-
गहू, तांदूळ,तेल इतर अन्नधान्य.
मेडिकल किट,साबण, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, दूध पावडर,पाणी बॉटल,चादर, बेडशीट, सतरंजी,
कपडे, टॉवेल,बिस्कीट,फरसाण
इतर जीवनाश्यक वस्तू.

जी काही मदत करायची आहे ती वस्तू रूपात करायची आहे. पैसे, रुपये नको.आर्थिक मदत नको. जे काही द्यायचे आहे ते वस्तुरूपात द्यावे हि विनंती.

ज्यांना मदत करायची आहे त्यांनी संस्थेच्या खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावे.

सुदेश पाटील (कोप्रोली )-
8097100073

प्रेम म्हात्रे (गोवठने )-
9967411996

हेमंत पवार (सारडे )-
9076371572

हेमंत म्हात्रे (नवीन शेवा )-
9930970025

सुरज पवार (पानदिवे)
7756869831

पत्रकार विठ्ठल ममताबादे (शंकर मंदिरा समोर, देऊळवाडी, बाझारपेठ जवळ उरण शहर)- -9702751098

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत