दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या स्मृतींना उजाळा

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या स्मृतींना उजाळा

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या स्मृतींना उजाळा

दिनांक 22 जुलै 2021 रोजी जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालया च्या फिल्म सोसायटी आणि जनसंज्ञापन विभागाच्यावतीने दिवंगत चित्रपट अभिनेते दिलीप कुमार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यान व चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्री महेंद्र तेरेदेसाई यांनी दिलीप कुमार यांच्या कारकिर्दीवर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिल्म सोसायटीचे समन्वयक डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी दिलीप कुमार यांच्या नैसर्गिक अभिनया बद्दल व एकूणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल आपले मत व्यक्त केले.

श्री महेंद्र तेरेदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिलीप कुमार व तत्कालीन चित्रपट सृष्टी मधील सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा आढावा घेतला. राजकुमार, दिलीप कुमार व देवानंद हे तीन कलावंत एकाच वेळेला अभिनया च्या क्षेत्रात आपले कसब दाखवत होते; मात्र दिलीप कुमार यांचा अभिनय ‘मेथड ॲक्टींग’ नावाने प्रसिद्ध झाला. ते केवळ ट्रॅजेडी किंग म्हणून सर्वपरिचित असले तरीही वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत असे श्री तेरेदेसाई म्हणाले . खरा कलावंत हा ‘अथलेट फिलॉसॉफर’ असतो; अर्थात त्यामध्ये खेळाडू सारखा लवचिकपणा आणि आयुष्याचं भान देणारी तत्त्वप्रणाली असते. दिलीप कुमार यांच्याकडे या दोन्ही गोष्टी होत्या. कॅमेरा मध्ये नेमकं काय टिपले जाणार आहे याची दिलीप कुमार यांना जाण होती असं ते म्हणाले.

या विशेष व्याख्यानानंतर दिलीप कुमार यांनी अभिनय केलेला ‘मधुमती’ हा चित्रपट आभासी पद्धतीने दाखविण्यात आला. जन संज्ञापन विभागाचे समन्वयक व उपप्राचार्य डॉ महेश पाटील यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. चिराग काजळे या विद्यार्थ्याने वक्त्याचा परिचय करून दिला तर श्रेया मेलमानी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा.सुभाष शिंदे डॉ.प्रियंवदा टोकेकर , ग्रंथपाल नारायण बारसे आणि अनेक प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

शुभम पेडामकर

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत