राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या पनवेलमधील पदाधिकाऱ्यांमुळे वाचले रिक्षाचालकाचे पाय

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या पनवेलमधील पदाधिकाऱ्यांमुळे वाचले रिक्षाचालकाचे पाय

Raje Foundation workers' army's panvel office bearer spared rickshaw driver's feet

पनवेल / प्रतिनिधी – ​पनवेल वरून मुंबईला प्रवाशी घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाचालकाने खांदेश्वर मंदिरासमोरील महामार्गावर उभ्या असलेल्या टेम्पोला धडक दिली हि धडक इतकी जोरदार होती कि रिक्षाचालकाचे दोन्ही पाय अडकले गेले होते तब्बल एक यास अपघात होऊन देखील रिक्षाचालकाला कोणतीही मदत मिळत नव्हती पायाव्यतिरिक्त रिक्षाचालकाच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली होती याच वेळेस राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक तसेच पनवेल तालुका कार्याध्यक्ष नितीन डोंगरदिवे यांनी हा प्रकार पहिला व गाडी थांबवून रिक्षाचालकांची मदत करून त्याची दोन्ही अडकलेले पाय बाहेर काढले व त्याला पुढील उपचारासाठी एमजी एम रुग्णालयात दाखल केले. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या माणुसकीचे रिक्षाचालकाने आभार मानले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत