एस.एन.डी.टी महिला विद्यापीठात र.धों.कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न

WhatsApp Image 2021 07 26 at 5.23.19 PM

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे 22 वी र. धों. कर्वे स्मृती व्याख्यानमाला संपन्न झाली.

या व्याख्यानमालेचे पुष्प डॉ. मोहन देस यांनी गुंफले.

या व्याख्यानमालेत डॉ. मोहन देस यांनी लोकसंख्या त्या संदर्भातील प्रश्न, महिला आणि आरोग्य यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

र.धों. कर्वे व्याख्यानमालेच्या माध्यमातून पर्यावरण, लोकसंख्या शिक्षण तसेच सामाजिक प्रश्नांसंदर्भात विद्यार्थिनींमध्ये संवेदनशीलता तयार करणे हा मुख्य उद्दिष्ट आहे असे मत विभागाच्या प्रभारी संचालिका डॉ.रोहिणी सुधाकर यांनी व्यक्त केले.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ मराठी साहित्यिक कै. विं. दा. करंदीकर ह्यांनी दिलेल्या देणगीतून ही व्याख्यानमाला सुरु करण्यात आली असुन ह्या 22 व्या व्याख्यानमालेस त्यांचे चिरंजीव श्री. आनंद करंदीकर आणि परिवारातील सदस्य सहभागी झाले होते.

ह्या व्याख्यानमालेचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर चव्हाण ह्यांनी केले.
ही व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण, डॉ. हेमांगी कडलग आणि प्रा.कांचन एक्का ह्यांचे विशेष सहकार्य लाभले.

शुभम पेडामकर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत