नवी मुंबई, पनवेल परिसरात पंकज शर्मा देतात अपंग, आर्मी, रुग्णांना फ्री सेवा

नवी मुंबई, पनवेल परिसरात पंकज शर्मा देतात अपंग, आर्मी, रुग्णांना फ्री सेवा

Pankaj Sharma provides free service to disabled, Army, patients in Navi Mumbai, Panvel area

पूरग्रस्तांनाही करतात मदत

सर्वसामान्य रिक्षा चालका कडूनही पूरग्रस्तांना सामान पोहोचवून मदतीचा हात

  • विठ्ठल ममताबादे

उरण – नवी मुंबई, पनवेल परिसरात मोफत प्रवासासाठी अपंग, आर्मी व रुग्णांनी पंकज शर्मा यांच्या 7039539956 या फोन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन. कळंबोली येथील रहिवाशी पंकज रामशंकर शर्मा हे सर्वसामान्य रिक्षाचालक आहेत. परंतु त्यांचे कार्य हे समाजासाठी खूपच उपयोगी व प्रेरणादायी आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरात अपंग, आर्मी, आणि दवाखान्यातील रुग्णांना कायस्वरूपी ते फ्री मध्ये सेवा देतात. अपंग, आर्मी आणि रुग्णांकडून ते प्रवासाचे कधीच पैसे घेत नाहीत. संपूर्ण नवी मुंबई मध्ये सेवा देणारे ते एकमेव रिक्षाचालक आहेत.समाजाची ते रात्रंदिवस 24 तास सेवा करत असल्याने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून अनेक जणांनी सत्कार केला आहे.आजच्या धक्का धक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात माणुसकी लोप पावत चालली आहे.

मात्र दुसरीकडे माणुसकी जिवंत ठेवणाऱ्या अशा प्रकारच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून पंकज शर्मा यांच्या समाजसेवी वृत्तीचा देखील जनतेने कौतुक केले आहे.आर्मी लव्हर म्हणून परिचित असलेले पंकज शर्मा यांचे आर्मी मध्ये जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही.त्यामुळे अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्णांना रिक्षा द्वारे कायमस्वरूपी मोफत प्रवास सेवा देऊन देशसेवा करण्याचा संकल्प त्यांनी केला.तेंव्हापासून आजपर्यंत व पुढेही हा संकल्प चालू ठेवणार असल्याचे पंकज शर्मा यांनी सांगितले.अपंग, आर्मी, हॉस्पिटल मधील रुग्ण यांनी मोफत प्रवासासाठी पंकज शर्मा यांच्या 7039539956 या फोन नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या रायगड जिल्ह्यात महाड पोलादपूर तालुक्यात पूर आला आहे. त्यांना मदतीसाठी सामान, वस्तू गोळा करण्याचे कार्य करणाऱ्या पनवेल,नवी मुंबई मधील संस्था, संघटना यांचे पुरग्रस्तचे सामान रिक्षातून टेम्पो मध्ये शिफ्ट करण्याचे काम फ्री मध्ये, कोणताही मोबदला न घेता करत आहेत.शारीरिक श्रम करून तसेच आपले ऑटो रिक्षा कामाला लावून सेवा बजावत आहे. तेही कोणतेही अपेक्षा न ठेवता. पंकज शर्मा हे नेहमी अपंगांना, रुग्णांना, आर्मी सैनिकांना फ्री सेवा देतात. आता पूरग्रस्तांचे जीवनावश्यक सामान बिल्डिंग मधून टेम्पो मध्ये किंवा एका परिसरातून दुसऱ्या परिसरात सामान पोहोचविण्याचे कामही सामाजिक बांधिलकीतून ते पार पाडत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत