नवीन पनवेलमधील नियॉन बिल्डर्स कर्मचाऱ्यांचा पगार थकवून पसार

नवीन पनवेलमधील नियॉन बिल्डर्स कर्मचाऱ्यांचा पगार थकवून पसार

Neon Builders in Naveen Panvel escape scarcity of employees' salaries

राजे प्रतिष्ठान कामगार सेना महिला पदाधिकारी बिल्डरविरोधात करणार गुन्हा दाखल

पनवेल / वार्ताहर

पनवेल तालुक्यात बुकिंग घेऊन रूम देतो असे सांगून फसवणूक करणारे बांधकाम व्यासायिकांची सध्या भरती आहे. गोर – गरिबांना लुटून त्यांच्या कष्टाच्या पैश्यावर मजा मारणारे बांधकाम व्यावसायिक सध्या पनवेल, नवीन पनवेल शहरामध्ये ठाण मांडून आहेत. नवीन पनवेलमधील असाच एक नियॉन बिल्डर नावाने ऑफिस टाकून मुंबईमधील एखाद्या वृत्तपत्रात जाहिरात देऊन नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रकार केला असून त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील पगार या नियॉन बिल्डरने थकवला असून कामगारांनी याबाबत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडे धाव घेतली.

त्यानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक मा.खा.छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या आदेशाने व महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ जितुकाका, सरचिटणीस चंद्रकांत धडके मामा, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, खजिनदार नारायण कोळी, सचिव मंगेश लाड, डी.डी.गायकवाड, उपाध्यक्ष राजू मरे, सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, अजय येवले, नवनाथ अहिरे, कायदेशीर सल्लागार ऍड. अनुप गाडे, ऍड. आर.के. पाटील, ऍड.संध्या जाधव व सल्लागार डॉ. गोरख बोबडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी व महिला कार्याध्यक्षा नूरजहाँ कुरेशी तसेच रायगड महिला जिल्हाध्यक्षा जस्मिन नजे यांनी नियॉन बिल्डर्सचे नवीन पनवेल येथील शुभम कॉम्प्लेक्स, सेक्टर ११, शिवा कॉम्प्लेक्सच्या समोर बिकानेर जवळ असलेल्या कार्यालयाला भेट दिली मात्र सदरचे ऑफिस बंद असून त्याठिकाणी आता नियॉनच्या जागी वास्तुदर्शन नावाने बॅनर लावला असल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर बांधकाम व्यावसायिक भंडारी आणि इरफान यांच्याशी फोनवर बोलणे केले असता माझ्याकडे पैसे नाहीत मी स्वतःचे बरे वाईट करून घेईल असे त्याने सांगितले यानंतर मात्र राजे प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी यांनी त्याला सांगितले कि तू २ दिवसामध्ये यांचा पगार दिला नाही तर जिथे असशील तिथे येऊन तुला चोप देऊ आणि पोलीस ठाण्यात हजर करू. याबाबत अधिक माहिती घेतली असता भंडारी नामक इसमाने आपल्या लोणावळा येथील प्रोजेक्टला सुरु करण्यासाठी इथे कार्यालय टाकले आणि इथली बुकिंग घेऊन तो सध्या पसार झाला आहे.

याबाबत महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई यांनी सांगितले कि आमही लवकरच याबाबत स्थानिक पोलीस ठाणे तसेच आर्थिक गुन्हे शाखा येथे तक्रार करून अजून देखील असे किती बिल्डर पनवेल परिसरात लोकांना फसवत आहे ज्यांच्याकडे नैना परवानगी नाही, रेरा रजिस्टर नाही अशांची यादी आर्थिक गुन्हे शाखेला देऊन त्यांची यादी प्रसिद्ध करणार आहोत तरच अशा बोगस बिल्डरांना लगाम मिळेल तसेच या नियॉन बिल्डरला तर आम्ही शोधून आमच्या पद्धतीने त्याला धडा शिकवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ज्या लोकांनी याठिकाणी बुकिंगसाठी पैसे भरले असतील त्यांनी ७८६७८६१८८८, ७४००११९७९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत