स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर भरती प्रक्रियेत डावलल्याने क्रांती दिनी नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे बेमुदत उपोषण

स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकर भरती प्रक्रियेत डावलल्याने क्रांती दिनी नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे बेमुदत उपोषण

Nagaon Mhatwali project affected unemployed organization's indefinite fast on Revolution Day as local project victims are left out in recruitment process

  • विठ्ठल ममताबादे

उरण तालुक्यात केंद्र शासनाचा ONGC प्रकल्प कार्यरत आहे या कंपनीत परप्रांतीयांची भरती सुरु असल्याने परप्रांतीयांच्या भरती प्रक्रियेला स्थानिक भूमीपुत्र व बेरोजगारांनी तीव्र विरोध केला होता.नागाव म्हातवली, चाणजे ग्रामपंचायत आणि प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या यादी व्यतिरिक्त इतर अन्य लोकांची भरती प्रक्रिया करू नये यासाठी नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेतर्फे 28 जून 2021 रोजी ONGC उरण गेट समोर तीव्र आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची व संघटनेच्या मागण्या लक्षात घेऊन संघटनेच्या मागण्या मान्य करत ONGC प्रशासनाने नागाव म्हातवली ग्रामपंचायत, चाणजे ग्रामपंचायत तसेच प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या यादीतील व्यक्तींनाच नोकरी देण्याचे कबूल केले होते.

मात्र सध्या हाउसकीपिंग भरती मध्ये परप्रांतीयांची भरती होत असल्याने नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष वैभव कडू यांनी या भरती प्रक्रियेस तीव्र आक्षेप नोंदविला आहे.28/6/2021 रोजी उरण मधील ONGC गेट समोर झालेल्या आंदोलनात ONGC कपंनी व नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटना यांच्या बैठकीत यापुढे होणाऱ्या नोकर भरती मध्ये फक्त आणि फक्त नागाव म्हातवली ग्रामपंचायत, चाणजे ग्रामपंचायत व प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून तयार असलेल्या यादी द्वारेच नोकर भरती करण्यात यावी. असे ठरले असतानाही इतर बाहेरील लोकांची भरती होत असल्याने स्थानिक भूमिपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त बेरोजगारांमध्ये ONGC कंपनी प्रशासना विरोधात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

त्यामुळे परप्रांतीयांची भरती रद्द करण्यात यावी यासाठी नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने कंपनी प्रशासनाशी पत्रव्यवहार केले असून मागण्या मान्य न झाल्यास 9 ऑगस्ट 2021 पासून कंपनीच्या गेटसमोरच बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटनेने ONGC प्रशासनाला दिला आहे.

“नागाव म्हातवली, चाणजे ग्रामपंचायत आणि प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचा विश्वासघात करून नोकरी प्रक्रिया चालू आहे. सदर परप्रांतीयांची नोकर प्रक्रिया तूर्तास थांबवावी. अन्यथा येत्या 9 ऑगस्ट 2021(ऑगस्ट क्रांती दिन )पासून ONGC च्या APU गेट समोरच बेमुदत उपोषण करण्यात येईल.”
-वैभव कडू, अध्यक्ष (नागाव म्हातवली प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघटना)

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत