नागाव ग्रामपंचायतीच्या निविदा गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी

नागाव ग्रामपंचायतीच्या निविदा गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी

Nagaon gram panchayat demands probe into tender malpractices

  • विठ्ठल ममताबादे

उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत ने पिरवाडी येथे स्मशानभूमी बांधणे तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळे शेजारी गटारे बांधणे या दोन कामाकरता एका वृत्तपत्रात छोटीशी जाहिरात(निविदा )प्रसिद्ध केली होती त्यात सविस्तर असे स्पष्ट नमूद केले होते की निविदा 9/6/2021 दुपारी 12 वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत 4 ठेकेदारांनी निविदा वेळेत, मुदतीपूर्व जमा केल्या.परंतु नागाव ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्यातरी दबावाखाली येऊन निविदा स्विकारण्याची मुदत संपल्यानंतरही निविदा स्वीकारल्या आहेत. आणि सदर कामे मुदती नंतर आलेल्या निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत.ही प्रक्रिया बेकायदेशीर व अवैध आहे त्यामुळे मुदतीनंतर आलेल्या निविदा रद्द करून योग्य तो निर्णय घ्यावा व ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या या निविदा प्रक्रियेच्या गैर कारभाराची चौकशी करावी अशी मागणी राघोबादेव मजूर सहकारी संस्था उरण अंबिकावाडी नागाव यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण , सभापती -पंचायत समिती उरण , रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष,मुख्य अधिकारी -सक्त वसुली संचालनालय मुंबई (ईडी ), अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांच्याकडे केली आहे.

श्री राघोबा देव मजूर सहकारी संस्था मर्यादित उरण,महादेव कुमार कंट्रक्शन, तुळजाभवानी मजूर सहकारी संस्था,सावली मजूर सहकारी संस्था या चार संस्थाने वेळेत मुदत संपण्यापूर्वी चार निविदा सादर केल्या होत्या. निविदा सादर करण्याची वेळ संपल्यानंतर एकूण किती निविदा आले आहे असे ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांना विचारले असता नंतर कळवू असे त्यांनी उत्तर दिले. पण दुसऱ्या दिवशी पिरवाडी स्मशानभूमी बांधणे व प्राथमिक शाळेचे गटर बांधणे या दोन्ही कामे कोणालाही सूचना न देता निविदा सादर न केलेल्या संस्थेला देण्यात आले.निविदा सादर केलेल्या संस्था सोडून इतर संस्थांना(ठेकेदारांना )सदर कामे देण्यात आल्याचे लक्षात येतात ग्राम विकास अधिकारी यांना याबद्दल चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली.ग्रामसेवकांनी आपल्या मर्जीतील लोकांना कामे दिली त्यामुळे सदर प्रक्रियेत गैरप्रकार झाला आहे.निविदा सादर करण्याच्या दिवशी म्हणजे 9/6/2021रोजीची सीसीटीव्ही(कॅमेरा )फुटेज बघण्याची विनंती केली असता आम्ही तुम्हाला सीसीटीवी फुटेज दाखवू शकत नाही आणि त्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता असे ग्रामसेवक किरण केणी यांच्याकडून सांगण्यात आले.त्यामुळे या सर्व प्रकारात गैरव्यवहार झाल्याने नागाव ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक किरण केणी यांच्या कारभाराची चौकशी करून योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी राघोबादेव मजूर सहकारी संस्था अंबिकावाडी नागाव या संस्थेने गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण , सभापती -पंचायत समिती उरण , रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष,मुख्य अधिकारी -सक्त वसुली संचालनालय मुंबई (ईडी ), अँटी करप्शन ब्युरो नवी मुंबई यांच्याकडे केली आहे.

“आम्ही निविदा बाबत सर्व प्रक्रिया व्यवस्थित कायदेशीर बाबीनुसारच, नियमात राहूनच पूर्ण केली आहे. सदर ज्यांनी ज्यांनी निविदा प्रक्रिया अवैध व बेकायदेशीर आहे असे सांगितले किंवा जे चौकशीला आले त्यांना ग्रामपंचायत मार्फत सर्व लेखी स्वरूपात माहिती दिली आहे. यात कुठेही गैरप्रकार झालेला नाही.”
– किरण केणी, ग्रामविकास अधिकारी, नागाव ग्रामपंचायत

“एकूण 4 ठेकेदारांनी (संस्थांनी )वेळेत, मुदत संपण्यापूर्वी निविदा भरल्या होत्या. दिलेल्या वेळेत इतर कोणत्याही ठेकेदाराने निविदा भरल्या नव्हत्या तरीही ग्रामपंचायतची कामे ज्यांनी निविदा भरल्या नाही त्यांना देण्यात आले. त्यामुळे सदर कारभाराची, निविदा प्रक्रियेची चौकशी व्हावी ही आमची रास्त मागणी आहे.”
-संकेत म्हात्रे, राघोबादेव मजूर सहकारी संस्था, अंबिकावाडी, नागाव

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत