MPSC च्या ढिसाळ कारभारामुळे नवी मुंबई मनसेची थेट विधानभवनवर धडक

MPSC च्या ढिसाळ कारभारामुळे नवी मुंबई मनसेची थेट विधानभवनवर धडक

Navi Mumbai MNS hits Vidhan Bhavan directly due to lax governance of MPSC

नवी मुंबई – पुण्यातल्या स्वप्नील लोणकर या तरुणाने mpsc परीक्षा उत्तीर्ण असूनही नोकरी न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याला न्याय मिळावा आणि पुन्हा कोणत्याही विद्यार्थ्याने अशा प्रकारे आत्महत्या करू नये यासाठी नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारविरुद्ध आंदोलन केलंय. यासाठी नवी मुंबई ते विधानभवनपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मात्र नवी मुंबई पोलिसांकडून हा मोर्चा रोखण्यात आला. त्याचप्रमाणे मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे आणि इतर मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वाशी पोलिसांकडून अटक करण्यात आली. स्वप्निलच्या आत्महत्येसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

तसेच ‘स्वप्नीलला न्याय मिळालाच पाहिजे” अशा घोषणा देखील यावेळी मनसेकडून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे #MPSCबळीस्वप्नीललान्यायद्या असा # देखील सोशल मीडियावर वायरल होत आहे. तसेच आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्हीही या आंदोलनात सामील व्हा असं मनसेकडून सांगण्यात येत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत