कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या गाडीचा अपघात

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या गाडीचा अपघात

Minister of State for Agriculture Dr. Vishwajeet Kadam's car accident

कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे मंगळवारी नागठाणे (ता. पलूस ) येथे महापुर स्थितीची पाहणी करण्यासाठी जात असताना त्याच्या ताफ्यातील पायलट गाडीचा अपघात झाला . त्यावेळी पायलट गाडी रस्त्याकडेच्या विजेच्य खांबावर जाऊन आदळळी. परंतु मंत्री कदम हे पूर्णपणे सुरक्षित आहेत

नागठाणे येथील पलूस तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला आहे. डॉ कदम देखील चार दिवसापासून पलूस तालुक्याची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. याचकरिता मंगळवारी सकाळी देखील ते ताफ्यासह नागठाणे परिसरामध्ये पाहणी करत होते. पाहणीकरत असताना पायलट गाडीला एका दुचाकीस्वारीने कट मारला

Vishwajeet Kadam 750x430 1

दुचाकी अचानक आडवी आल्याने पायलट चालकाचे गाडीवरील नियंत्रण हरवले. तेथील रस्ता पुरेसा रुंद नसल्याने पायलट गाडी घसरली असता बाजूच्या असलेल्या खांबावर जाऊन आदळली आणि उलटली. गाडी उलटी झाली असता गाडीतील दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले.

मंत्री कदम यांनी गाडी थांबवून तातडीने पोलिसांच्या मदतीला धाव घेतली. जखमींना स्वतःच्या गाडीत बसवून जवळील आष्टा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील पाहणीसाठी रवाना झाले. अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत