महेंद्र घरत यांच्या तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

महेंद्र घरत यांच्या तर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

Mahendra Gharat extends helps to flood victims

  • विठ्ठल ममताबादे

उरण – काँग्रेसची बुलंद तोफ,कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी चिपळूण येथील पूरग्रस्तांना 1000 ब्लँकेट,चादर,चटई,मेणबती,मच्छर,अगरबत्ती चे किट त्याठिकाणी पाठवुन पूरग्रस्तांना आपल्या परिने छोटासा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस आणि पनवेल विधानसभेचे निरीक्षक रमेश किर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांतजी यादव,रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव रफिक मोडक, चिपळूण तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष महेश कदम, चिपळूण शहर युवक अध्यक्ष फैजल पिलपळे यांच्या कडे चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचे किट सुपूर्द करण्यात आले.

या वेळी रायगड जिल्हा इंटक व उरण शहर काँग्रेस चे अध्यक्ष किरिट पाटील, रायगड जिल्हा इंटक व उरण विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विवेक म्हात्रे, पनवेल तालुका इंटकचे सरचिटणीस योगेश रसाळ, NMGKS संघटनेचे संघटक आनंद ठाकूर, साहिल भोईर यांनी हे किट सुपूर्द केले.यावेळी पुरग्रस्तांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मनापासुन आभार मानले. अशा या रायगडच्या दानशुर नेत्याचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत