Kargil Victory Day | पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवानांना केलं अभिवादन !

Kargil Victory Day | पंतप्रधान मोदी यांनी शहीद जवानांना केलं अभिवादन !

Kargil Victory Day | Prime Minister Modi greets the martyred soldiers!

kargil vijay diwas : देशात आज 22 वा कारगिल विजय दिवस साजरा होत आहे. या दिनानिमित्त राष्ट्रपतींसह पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शहीद जवानांना अभिवादन केलं आहे. 1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. यानिमित्त देशाचे राष्ट्रपती आणि सशस्त्र सैन्याचे सर्वोच्च कमांडर रामनाथ कोविंद आज द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते. मात्र खराब वातावरणामुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रपती कोविंद गुलमर्गला जात आहेत तिथं ते जवानांशी संवाद करतील.

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने द्रासमध्ये चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत आणि लष्कराच्या उत्तरी विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी आणि लेह येथील 14 व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन उपस्थित राहणार होते.

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या चार दिवसांच्या दौर्‍याचा भाग म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी येथे दाखल झाले आहेत. राष्ट्रपती सोमवारी लडाखमधील द्रास शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते. मात्र खराब हवामानामुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याआधीही 2019 च्या सुरुवातीला खराब हवामानामुळे कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमाता राष्ट्रपती सहभागी होऊ शकले नव्हते.

WhatsApp Image 2021 07 26 at 11.15.48 AM

विजय दिन का साजरा केला जातो?

कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ साजरा केला जातो

1999 मध्ये कारगिलच्या उंच शिखरांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. ज्यात भारताने विजय मिळवला होता. त्या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवस दरवर्षी कारगिलच्या द्रास येथील युद्ध स्मारकात साजरा केला जातो. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने भारताच्या या शिखरांवर घुसखोरी केली होती. 14 ते 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या शिखरावरून भारतीय सैन्याने मोठ्या शौर्याने पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावलं होतं. या युद्धामध्ये आपले 500 सैनिक शहीद झाले होते. हे युद्ध लष्करी इतिहासामध्ये एक अतिशय कठीण आणि धोकादायक युद्ध म्हणून ओळखले जाते.पंतप्रधान मोदी यांनी काल मन की बातमध्ये म्हटलं होतं की, 26 जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, असं ते म्हणाले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत