IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला घरी परतताच थेट हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली.

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले. कोरोना संकटात कुटुंबीयांना भेटताना सर्वांना खूप आनंद झाला. पण, राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला घरी परतताच थेट हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली. चेतनचे वडील कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

चेतननं गेल्या आठवड्यात वडिलांच्या प्रकृतीबाबत सांगितले होते आणि आयपीएल २०२१मधून मिळालेला पगार त्यानं त्वरित घरी पाठवला होता. घरी परतल्यानंतर तो सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या बाकावरच बसून होता. त्याच्या वडिलांना मधुमेहाची समस्या आहे आणि आता कोरोना झाल्यानं तो चिंतीत आहे. ”काही दिवसांपूर्वी मला राजस्थान रॉयल्सकडून पगार मिळाला होता आणि तो मी लगेच घरी ट्रान्सफर केला. त्यानं या कठीण काळात माझ्या कुटुंबीयांना मदत झाली,”असे चेतननं Indian Expressशी बोलताना सांगितले.

सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतनसाठी आयपीएलमधून मिळणारे पैसे हे घर चालवण्यासाठी खूप मोठं हातभार लावणारे आहेत. २३ वर्षीय चेतनला आयपीएल २०२१च्या लिलावात १.२० कोटीला राजस्थाननं करारबद्ध केलं.” लोकं म्हणतात आयपीएल रद्द करा, मी त्यांना काहीतरी सांगू इच्छितो. माझ्या घरात मीच एकटा कमावता आहे आणि क्रिकेट हे एकमेव माझ्या उत्पन्नाचे साधन आहे.आयपीएलमधून मिळालेल्या पैशांतून वडिलांचा चांगले उपचार देऊ शकलो. जर ही स्पर्धा झाली नसती तर मला खूप कठीण गेलं असतं. मी एका गरीब कुटुंबातूनआ आलोय आणि माझ्या वडिलांनी टॅम्पो चालवून घराचा गाढा हाकला आहे. आयपीएलनं माझं आयुष्य बदललं आहे,”असेही चेतन म्हणाला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत