IPL 2021 : संथ फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने केले दोन विक्रम

IPL 2021 : संथ फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने केले दोन विक्रम

दिल्ली : आयपीएल गुणतालिकेत तळात असलेल्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात आश्चर्यकारकरित्या संथ फलंदाजी केली. परंतु त्याने ही संथ फलंदाजी करत दोन विक्रम आपल्या नावार केले.

वॉर्नरने टी – २० मध्ये आपल्या १० हजार धावा पूर्ण केल्या. याचबरोबर ५० चेंडूत अर्धशतक ठोकत आपले आयपीएलमधील अर्धशतकांचे अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये ५० अर्धशतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला.डेव्हिड वार्नरने आज आपल्या डावाची सुरुवात आक्रमक करण्याचा प्रयत्न केला पण, बेअरस्टो पॉवर प्लेमध्येच बाद झाल्यानंतर त्याने संथ फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूने मनिष पांडेने त्याच्या नंतर येत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर वॉर्नर ५५ चेंडूत ५७ धावा करुन बाद झाला.

हैदराबादने १४ व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. सीएसकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत वॉर्नरसारख्या स्फोटक फलंदाजाला शांत ठेवले. याचबरोबर या सामन्यात सीएसकेने उत्तम क्षेत्ररक्षण करत हैदराबादला एक एक धावेसाठी चांगलाच घाम गाळायला लावला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत