IPL २०२१ : बालाजीसोबत बसल्यामुळे मायकेल हसीला कोरोनाची लागण?

IPL २०२१ : बालाजीसोबत बसल्यामुळे मायकेल हसीला कोरोनाची लागण?

चेन्नई सुपर किंग्जसाठी (सीएसके) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीची कोरोना चाचनी निगेटिव्ह आली आहे. हसी सध्या चेन्नई येथे असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी तो करोना पॉझिटिव्ह आला होता.करोनाने बायो बबलला भेदल्यानंतर आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. चेन्नईच्या संघातही करोनाने प्रवेश घेतला होता.

चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एक बस क्लीनर हे करोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ४ मे रोजी सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळला. त्याआधी केकेआरचे वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांनाही करोनाची लागण झाली. या सर्व कारणांमुळे आयपीएल कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मायकेल हसीने आपल्या प्रकृतीविषयी दिली प्रतिक्रिया

हसी म्हणाला, ”भारतात काय चालले आहे याबद्दल मला जाणीव आहे. फ्रेंचायझीकडून माझी काळजी घेण्यात आली. मी आता आयसोलेशनमध्ये विश्रांती घेत आहे आणि आशा आहे, की आणखी एक चाचणी निगेटिव्ह येईल.” मायकेल हसीच्या म्हणण्यानुसार, तो गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीजवळ बसला होता आणि कदाचित त्यामुळेच त्यालाही करोनाचा संसर्ग झाला.

आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी चांगली झाली होती. त्यांनी ५ सामने जिंकले तर २ सामने गमावले होते. गुणतालिकेत सीएसकेची टीम दुसऱ्या क्रमांकावर होती.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत