ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भारतीय महिला

ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भारतीय महिला

Indian woman wins a fencing match at the Olympics

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात धमाकेदार झाली. भारताच्या सीए भवानी देवीनं इतिहास रचत ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजिजचा पराभव करत तलवारबाजीचा सामना जिंकला आहे. ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिली महिला खेळाडू आहे. भवानी देवी (CA Bhavani Devi) नं महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात 15-3 अशा फरकानं विजय मिळवला.

आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा या सामन्यात सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. भवानीनं सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकानं जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीनं दुसऱ्या राउंडमध्येही ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. दुसरा राउंडही भवानी देवीनं 7-3 अशा फरकानं आपल्या बाजूनं केला. भवानी देवीनं अवघ्या सहा मिनिटांत हा सामना आपल्या खिशात घातला. आता महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये भवानीचा सामना फ्रांन्सच्या मॅनॉन ब्रूनेटसोबत होणार आहे.

WhatsApp Image 2021 07 26 at 11.25.37 AM 1

ऑलिम्पिकमध्ये सामना जिंकणारी पहिली महिला तलवारबाज

चेन्नईत राहणारी भवानी देवी ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय होणारी पहिली भारतीय तलवारबाज आहे. आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.

1197571 bhavani devi

दरम्यान, तलवारबाजीच्या सेबर स्पर्धेत तलवारबाज प्रतिस्पर्ध्यावर वार करुन गुणांची कमाई करता. यामध्ये कंबरेच्यावर आणि मनगटाव्यतिरिक्त कुठेही तलवारीनं स्पर्श करुन गुण मिळवता येतात.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत