ICC WTC Final 2021: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, फायनल सामन्यापूर्वी या किवी फलंदाजाने इंग्लंडमध्ये केला कहर

ICC WTC Final 2021: टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, फायनल सामन्यापूर्वी या किवी फलंदाजाने इंग्लंडमध्ये केला कहर

भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यापूर्वी किवी संघ यजमान इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जात असून पहिल्या दिवशी डेव्हन कॉनवेने शानदार फलंदाजी करताना शतक ठोकले. कॉनवेची इंग्लंडच्या खेळपट्टीवर अशी आक्रमक फलंदाज टीम इंडियासाठी धोक्याची घंटा सिद्ध होऊ शकते.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (World Test Championship Final) सामन्यात आता मोजके दिवस शिल्लक आहेत. डब्ल्यूबीसी अंतिम सामना भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघ यांच्यात 18 जून ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टनच्या (Southampton) रोज बाउल स्टेडियमवर (Rose Bowl Stadium) खेळला जाईल. अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यापूर्वी किवी संघ यजमान इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर (Lord’s Cricket Ground) खेळला जात असून पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत किवी संघाने पहिल्या दिवशी तीन गडी गमावून 246 धावा केल्या. न्यूझीलंडकडून आपला कसोटी सामना खेळणार्‍या डेव्हन कॉनवेने (Devon Conway) शानदार फलंदाजी करताना शतक ठोकले. 

कॉनवे सध्या 240 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 136 धावांवर नाबाद खेळत आहे. तसेच अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज हेन्री निकोल्स 149 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 46 धावा करून त्याला चांगली साथ देत आहे. कॉनवेची इंग्लंडच्या खेळपट्टीवर अशी आक्रमक फलंदाज टीम इंडियासाठी धोक्याची घंटा सिद्ध होऊ शकते. इंग्लंड दौर्‍यावर जर कॉनवे अशीच फलंदाजी करत राहिला तर अंतिम सामन्यात तो टीम इंडियासाठी फायनल सामन्यात घातक ठरू शकतो. न्यूझीलंडकडून मर्यादित ओव्हर क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या कॉनवे याने लॉर्ड्स कसोटी सामन्यातून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या या स्टेडियमवर डेब्यू सामन्यात शतकी धावसंख्या पार करणारा तो पहिला किवी फलंदाज ठरला आहे.

इतकंच नाही तर त्याने दिवसाखेर 136 नाबाद धावा करत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड देखील मोडून काढला. गांगुलीने 25 वर्षांपूर्वी लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण करताना शतक झळकावले होते आणि 131 धावांची खेळी केली होती. गांगुलीने 301 चेंडूंचा सामना करताना हे शतक झळकावले. चक्क 25 वर्षानंतर कॉनवेने हा विक्रम मोडला आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंडसाठी पहिल्या कसोटी सामन्यातून जेम्स ब्रॅसी आणि ऑली रॉबिन्सन यांनी टेस्ट डेब्यू केले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत