महाडच्या पूरग्रस्तांसाठी जाणार शिरढोण पुण्यभूमीतून मदत

महाडच्या पूरग्रस्तांसाठी जाणार शिरढोण पुण्यभूमीतून मदत

Help from Shirdhon Punyabhoomi to go for Mahad flood victims

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत संघर्ष समितीचा पुढाकार

पनवेल : प्रतिनिधी

महाड, पोलादपूर, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सरकार, प्रशासन सारेच त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भूमिकेतून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव असलेले पनवेल तालुक्यातील शिरढोण गावामधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके समिती मदतकार्यात उतरली आहे. अधिकाधिक लोकांनी पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. ३१ जुलै रोजी समितीचे स्वयंसेवक मदतीची वाहने घेऊन महाडमध्ये दाखल होणार आहेत. दरड कोसळून जिवीतहानी झालेल्या तळीये गावासह महाड तालुक्यातील ग्रामीण भागामधील ग्रामस्थांना ही मदत पोहोचवली जाणार आहे, अशी माहिती आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीचे अध्यक्ष योगेश मुकादम यांनी दिली.

पीठ, तांदूळ, तेलाची पिशवी, मीठ, आंघोळीचा-कपड्याचा साबण, कोलगेट, तेल, सॅनिटरी नॅपकिन, सुखे खाद्य-फरसाण, बिस्कीट, ब्लँकेट, चटई, टॉवेल, मेणबत्ती, पाण्याची बाटली, सॅनिटायझर, माचिस, फिनाईल अशा स्वरुपात मदत स्विकारली जाणार आहे.

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ९३२१५५६००६, ९७०२४८८८३६, ९७७३०७०९००, ९६९९०९०९६९, ९००४९१६९९१ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावे, असे आवाहन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके समितीकडून करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत