एक हात मदतीचा…

एक हात मदतीचा…

help for people who affected in flood

महाड, पोलादपूर, चिपळूण, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सरकार, प्रशासन सारेच त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भूमिकेतून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके समिती मदतकार्यात उतरली आहे. ‘तुम्हाला पूरग्रस्तांना मदत करायची आहे? मग त्वरित आमच्याशी संपर्क साधा,’ असे या समितीद्वारे नागरिकांना वारंवार सांगण्यात आले.

पीठ, तांदूळ, तेलाची पिशवी, मीठ, आंघोळीचा-कपड्याचा साबण, कोलगेट, तेल, सॅनिटरी नॅपकिन, सुखे खाद्य-फरसाण, बिस्कीट, ब्लँकेट, चटई, टॉवेल, मेणबत्ती, पाण्याची बाटली, सॅनिटायझर, माचिस, फिनाईल अशा विविध गोष्टी देऊन मदत करण्याचे आवाहन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके समितीतर्फे करण्यात आले आहे.

योगेश मुकादम ९३२१५५६००६, सुश्रुत भोईर ९७०२४८८८३६, रोशन पवार ९७७३०७०९०० , संग्राम भोपी ९६९९०९०९६९ , प्रशांत घरत ९००४९१६९९१ , विनोद ठकेकर ९८३३७३५६८९ या मोबाईल क्रमांकांवर गुगल पे द्वारे देखील आपण पैसे पाठवू शकता असे या समितीतर्फे सांगण्यात आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत