गुरूपौर्णिमा…

गुरूपौर्णिमा…

गुरूपौर्णिमा

गुरुपौर्णिमा हा दिवस आदर, प्रेम, आभार आणि आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवांचे स्थान आहे. अनेक शाळा, कॉलेज, सांप्रदाय देखिल गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रध्दा पुर्वक साजरी केली जाते. हा दिवस गुरू व शिष्य दोघांसाठी महत्त्वाचा असतो.

गुरू शिष्य यांच्यातील नात्याचे अनोखे चित्र दर्शविणारे जोड्या प्रसिद्ध आहेत. तसेच या दिवशी गुरुंनी शिष्याला अंधारातून शिक्षण देत उजेड दिलें आहे. या गुरु पौर्णिमेच्या दिवशी या प्रकाशाला वंदन केलें जाते. विनम्रपणे या दिवशी गुरुशिष्य हा दिवस साजरा करतात.

लॉकडाऊनमध्ये सुद्धा आमची साथ आमच्या शिक्षकांनी सोडली नाही. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी आम्हा सगळ्यांना शिकवलं यामुळे शिक्षक माझ्या मनात नेहमीच घर करुन राहतील.

ज्ञानाचा मार्ग तर गुरु दाखवतात पण सोबत माणूस म्हणून जगण्याची उर्जा देत असतात. मला माझ्या आई- वडिलांनी, शिक्षकांनी तसेच माझ्या मित्र-मैत्रिणीं खुप काही शिकवले आहे त्या सगळ्यांचे मनापासुन आभार. सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभ्रा मोरे, ९वी
साधना विद्यालय, सायन
सलाम बॉम्बे फाउंडेशन, मिडीया अकादमी

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत