GST Council Meeting: आज GST काउन्सिलची बैठक, या महत्त्वाच्या निर्णयावर अर्थमंत्री करू शकतात शिक्कामोर्तब

GST Council Meeting: आज GST काउन्सिलची बैठक, या महत्त्वाच्या निर्णयावर अर्थमंत्री करू शकतात शिक्कामोर्तब

जीएसटी काउन्सिलची 43 वी बैठक (43rd GST Council Meeting) आज 28 मे रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत.

नवी दिल्ली, 28 मे: जीएसटी काउन्सिलची 43 वी बैठक (43rd GST Council Meeting) आज 28 मे रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman)  या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. आठ महिन्यांनी ही बैठक होणार असून अनेक महत्त्वाच्या बाबींवर या बैठकीत चर्चा व त्यानंतर त्याबाबत निर्णय होणं अपेक्षित आहे. कोविड-19 आजाराशी (Coronavirus) संबंधित औषधं, लसी तसंच मेडिकल उपकरणं यांवरचा जीएसटीचा दर कमी करणं तसंच पेट्रोल आणि डिझेलवरच्या करांबाबत निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो.

या आधी ऑक्टोबर 2020 मध्ये जीएसटी काउन्सिलची बैठक झाली होती. कोरोना विषाणू महामारीमुळे विविध राज्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असून त्यांनी केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागितली आहे. याबाबतचा निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो.

भारतात कोविड मदत कार्यासाठी  राज्य सरकार किंवा केंद्राच्या अधिकृत संस्थेने भारतात मोफत वाटण्यासाठी इंपोर्टेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवला असेल तर त्यावर आयजीएसटीमध्ये (IGST) सूट देण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला आहे.

> आजच्या बैठकीत जीएसटी रिटर्न फायलिंग संदर्भात एका अॅमनेस्टी स्कीमची घोषणा केली जाऊ शकते. 1 जुलै 2017 ते एप्रिल 2021 पर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व GSTR-3B रिटर्न्‍सचा समावेश या स्कीममध्ये करून घेतला जाईल. सर्व जीएसटी रजिस्टर्ड व्यवसायाला GSTR-3B रिटर्न भरावा लागतो.

> याशिवाय पेट्रोल-डिझेलवरील करांबाबतही या बैठकीत चर्चा होईल. केंद्र सरकारने याआधी अनेकदा म्हटलंय की पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणायला हवं. याबाबत राज्यांची मतं जाणून घेऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढचा रोडमॅप निश्चित करू शकतात.

> राज्यांनी मागितलेलं FY22 जीएसटी कॉम्पेन्सेशन आणि जीएसटी रेट या दोन्हीबद्दलही या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. जीएसटी महसूल कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारनी FY21 मध्ये एका फायनॅन्सिंग मेथडबाबत सर्वसहमती मिळवली होती. या बैठकीत तिच मेथड FY22 मध्ये सुरू ठेवावी की नको याबाबत चर्चा होऊ शकते.

> जीएसटीतील 12 आणि 18 टक्क्यांच्या दोन स्लॅब एकत्र करण्यासंबंधीचा निर्णय बराच काळ झाला प्रलंबित आहे. त्यामुळे या विषयावरही या बैठकीत निर्णय व्हायची शक्यता आहे.

बैठकीनंतर महत्त्वाचे निर्णय जाहीर केले जातील त्यातून अधिक खुलासा होईल.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत