GREAT..! व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासाठी धावला यजुर्वेंद्र चहल, केली ‘इतकी’ मदत

GREAT..! व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णासाठी धावला यजुर्वेंद्र चहल, केली ‘इतकी’ मदत

देश सध्या करोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेविरुद्ध झुंज देत आहे. रुग्णालयात रुग्णांना बेडही मिळणे अवघड झाले आहे. जे या व्हायरसच्या संकटात सापडले आहेत ते रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहेत, तर करोनापासून दूर असलेले इतरांना मदत करण्यात गुंतले आहेत. अशातच भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलनेही क्रायडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे बंगळुरुच्या एका रुग्णाला आर्थिक मदत केली आहे.

चहलने या रुग्णाला मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची देणगी दिली आहे. बंगळुरूच्या एका रूग्णाने या निधीसाठी चार लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले होते, त्यापैकी चहलने अर्धी देणगी दिली आहे. या रुग्णाच्या एका ओळखीच्या व्यक्तीने लिहिले, की करोनाशी लढणाऱ्या त्याच्या मित्राच्या कुटूंबातील अमूधा या सदस्याला हा निधी दिला जात आहे. बंगळुरूच्या सेंट जॉन मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये हा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. उपचाराचा खर्च भागविण्यासाठी कुटुंबाने जे काही करता येईल ते केले, परंतु अद्याप ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यानंतचर चहलने ही मदत केली. चहलव्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढे आले आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, चहलचे कुटुंबही करोनाशी झुंज देत आहे. त्याचे वडील करोनामुळे त्रस्त असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय चहलच्या आईलाही करोनाची लागण झाली असून घरीच तिच्यावर उपचार सुरू आहेत. चहलची पत्नी धनश्रीने ही माहिती दिली होती.

विराट-अनुष्काने उभारलेल्या निधीत चहलची मदत

भारतात करोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी अनेक मदत निधीची स्थापना केली जात आहे. देशात करोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभागाला सुविधा पुरविणे कठीण होत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी एक मदत निधी उभारला. चहलने पुढे येत या मदतनिधीला ९५,००० रुपयांची देणगी दिली. हरियाणाचा हा लेगस्पिनर कोहलीचा जवळचा मानला जातो. २०१४च्या आयपीएल हंगामापासून हे दोघेही एकत्र आरसीबीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत