‘जावे पक्ष्यांच्या गावा’ या विषयावर उत्कृष्ठ व्याख्यानमाला

‘जावे पक्ष्यांच्या गावा’ या विषयावर उत्कृष्ठ व्याख्यानमाला

Excellent lecture on 'jaave pakshyanchya gava'

  • शुभम पेडामकर

विद्या प्रसारक मंडळाचे के. ग. जोशी कला व ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त )ठाणे, आयोजित डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे तिसावे पुष्प दिनांक २९ जुलै २०२१ रोजी ज्येष्ठ ख्यातनाम पक्षी निरीक्षक, पर्यावरण तज्ज्ञ,लेखक श्री. किरण पुरंदरे यांनी ‘जावे पक्ष्यांच्या गावा’ या विषयावर ऑनलाईन स्वरूपात गुंफले.

डॉ. वा. ना. बेडेकर व्याख्यानमालेची समृद्ध परंपरा आणि त्यातून होणारे विचारमंथन याचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना खूप लाभ होतो असे मत यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी व्यक्त केले. जिथे आजकाल माणसाला माणसाची भाषा समजत नाही तिथे पक्षांची भाषा समजून घेणारे जाणकार तज्ज्ञ व्याख्यानाला लाभले याबद्दल प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी आनंद व्यक्त केला.

किरण पुरंदरे यांनी विविध पक्षी, त्यांचे प्रकार याबद्दल माहिती दिली. पक्षी निरीक्षणाचे सूत्र सांगत त्यांनी व्याख्यानाची सुरुवात केली. जंगल सफर आणि पक्षी निरीक्षण मनुष्याला समृद्ध बनवतात असे मत किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना किरण पुरंदरे म्हणाले की आयुष्यात जे कराल ते जिद्दीने करा. किरण पुरंदरे यांनी पावशा, घुबड, गरुड, ऑस्ट्रिच, किवी, रानकोंबडा अशा विविध पक्षांच्या प्रजातींविषयी माहिती देऊन त्यांचे हुबेहूब आवाज काढले.

किरण पुरंदरे यांनी पक्षांचे संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू अशा विविध भाषांमधील नामावली बद्दल सांगत त्यातील संशोधनाच्या संधींबाबत माहिती दिली. नागझिरा जंगलातील त्यांच्या 400 दिवसांच्या वास्तव्याबद्दल सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोतरे झाली. या व्याख्यानाचे आयोजन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईकयांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य सुभाष शिंदे, डॉ. प्रियंवदा टोकेकर, प्रा. संगीता दीक्षित, ग्रंथपाल प्रा. नारायण बारसे , सर्व प्राध्यापक गुगल मीट अँपद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ. विमुक्ता राजे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन उप प्राचार्य डॉ. महेश पाटील यांनी केले तर तांत्रिक बाजू प्रा. प्राची नितनवरे यांनी सांभाळली. व्याख्यानाची सांगता पसायदानाने झाली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत