कोकणातील लोकांना उप महापौरांनी केली मदत…

कोकणातील लोकांना उप महापौरांनी केली मदत…

Deputy Mayor helps people of Konkan...

कोकणात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे कोकणावर मोठं संकट आले आहे. या संकटावर कोकणवासीयांना मात करता यावी यासाठी महाराष्ट्र भरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नवी मुंबईतील काँग्रेसचे माजी उपमहापौर कोकण सुपुत्र अविनाश लाड यांनी देखिल आपली जन्मभूमी असलेल्या कोकणाला सावरण्यासाठी मदतीचा हाथ पुढे केला आहे.अविनाश लाड यांच्या पुढाकाराने प्रभागातील नागरिकांच्या मदतीने १ टेम्पो भरून विविध प्रकारच्या १५ जीवनावश्यक वस्तू आज कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. कोकणात अनेक ठिकाणावरून मदत पोहचत असली तरी अनेक खेडेगाव असे आहेत जिथे अद्याप मदत पोचली नसून त्याठिकाणी मदत पोहचविण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी माजी उपमहापौर अविनाश लाड यांनी व्यक्त केली. तर प्रभागातील नागरिकांनी अविनाश लाड यांनी घेतलेल्या पुढाकाराची प्रशंसा करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत