Covid-19 Vaccine : लसीकरणानंतर धुम्रपान केल्यानं लसीचा शरीरावर प्रभाव कमी होतो? तज्ज्ञांचं मत काय?

Covid-19 Vaccine : लसीकरणानंतर धुम्रपान केल्यानं लसीचा शरीरावर प्रभाव कमी होतो? तज्ज्ञांचं मत काय?

Covid-19 Vaccine : अद्यापही अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत अनेक प्रश्न आहेत. लसीकरण करावं का? किंवा लसीकरण केल्यानंतर काय करावं आणि काय करु नये? यांसारख्या अनेक प्रश्नांनी अनेकांच्या मनात घर केलं आहे. अशातच अनेकांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लसीकरणानंतर धुम्रपान केल्यानं लसीचा शरीरावरील प्रभाव कमी होतो का? Coronavirus Vaccination : कोरोना नियमांचं पालन करण्यासोबत कोरोना लसीकरण करणं म्हणजे, स्वतःचं कोरोनापासून बचाव करण्याचा एकमात्र उपाय. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे लसीकरण अभियान अधिक वेगानं सुरु आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यास केंद्र सरकारनं 1मेपासून परवानगी दिली आहे. अशातच लसीकरण करताना सर्वांच्या मनात अनेक प्रश्न येतात. लसीकरणानंतर काय करावं आणि काय करु नये, यांसारख्या प्रश्नांची उत्तर न मिळाल्यामुळे अनेकजण लसीकरण करुन घेणं टाळतात. अशातच अनेकांच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, लसीकरण केल्यानंतर धुम्रपान करु शकतो का? यासंदर्भात तज्ज्ञांचं मत काय? लसीकरणानंतर धुम्रपान करणं योग्य आहे? यांसारख्या प्रश्नांचं निरसन होणं अत्यंत आवश्यक आहे.

Noticia 20201104 VacunaCovid 600x400

लसीकरण केल्यानंतर धुम्रपान करु शकतो? 

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्ती धुम्रपान करतात, त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी आवश्यक आहे की, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत लवकरात लवकर कोरोना वॅक्सिन घ्यावं. धुम्रपान केल्यानं फुफ्फुसांची आरोग्याला धोका निर्माण होतो. तसेच सतत धुम्रपान केल्यानं रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. तसेच श्वसनाचे विकास जडण्याचाही धोका वाढतो. अनेक संशोधनातून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. 

तज्ज्ञांनी सोशल मीडियावर दिली महत्त्वाची माहिती 

न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर विशाखा यांनी सोशल मीडियावर लसीकरणानंतर काय करावं? काय करु नये? यांदर्भातील काही सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांनी धुम्रपान करणं टाळलं पाहिजे, कारण यामुळे लसीकरणामुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीजचा रिस्पॉन्स कमी होतो. एखादी व्यक्ती जर लसीचा डोस घेणार असेल तर त्या व्यक्तीनं काय करावं? यासंदर्भात डॉक्टरांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लस घेतलेल्या व्यक्तीनं पूर्ण झोप घेणं अत्यंत गरजेचं असून रात्री सहा तासांची झोप घेणं गरजेचं आहे. 

तणाव कमी करण्यासाठी लोकांनी श्वसनाचे व्यायाम करणंही अत्यंत गरजेचं आहे. केवळ धुम्रपानच नाहीतर मद्यपानही लसीकरणाविरोधात रोगप्रतिकार शक्ती कमी करण्यास कारण ठरु शकतं. अशाप्रकारे लसीचा डोस घेण्यापूर्वी तीन दिवस आधी मद्यपान करणं टाळावं. 

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत