Covid-19 pandemic : सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत, तर CSKनं राज्य सरकारला दिले 450 ऑक्सिजन संच

Covid-19 pandemic : सनरायझर्स हैदराबादची 30 कोटींची मदत, तर CSKनं राज्य सरकारला दिले 450 ऑक्सिजन संच

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दररोज तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला पाहायला मिळत आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दररोज तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला पाहायला मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांना जीव गमवावा लागत आहे. अशात अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेताना कडक निर्बंध लागू केली आहेत. कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) तामीळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दान करण्याचा निर्णय घेतला, तर सनरायझर्स हैदराबादनं सोमवारी दुसऱ्या लाटेत होरपळलेल्यांसाठी 30 कोटींची मदत जाहीर केली.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( 1 कोटी), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स ( 37 लाख), ब्रेट ली ( 40 लाख) यांनी आपापल्या परीनं कोरोना लढ्यात मदत केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व पत्नी अऩुष्का शर्मा यांनी 2 कोटींची मदत जाहीर करताना Ketto सह 7 कोटींचा निधी गोळा करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यांच्या या मोहिमेत युझवेंद्र चहल यानंही 95 हजारांची मदत केली आहे. राजस्थान रॉयल्स संघानंह 7.5 कोटींची मदत जाहीर केली. रिषभ पंतनेही मदतीचा हात पुढे केला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत