Coronavirus ला मात दिल्यावर या टेस्ट नक्की करा, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Coronavirus ला मात दिल्यावर या टेस्ट नक्की करा, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना लवकरात लवकर वॅक्सीन (Covid-19 Vaccine) घेण्याचा आणि पोस्ट रिकव्हरी (Post Recovery Test) टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे

जीवघेण्या कोरोना व्हायरससोबतची (Coronavirus) लढाई जिंकलेल्या रूग्णांसाठी हेल्थ एक्सपर्टकडून नुकताच एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना लवकरात लवकर वॅक्सीन (Covid-19 Vaccine) घेण्याचा आणि पोस्ट रिकव्हरी (Post Recovery Test) टेस्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

resize 16206308172091970597821083antobodytest1 202105613904

डॉक्टरांनुसार, कोरोना व्हायरस माणसाच्या इम्युन सिस्टींम आणि शरीराच्या अनेक महत्वपूर्ण अवयवांना मोठं नुकसान पोहोचवतो. ज्यामुळे नंतर फार त्रास होण्याची शक्यता असते. अशात जर तुम्ही पोस्ट रिकव्हरी टेस्ट कराल तर हे माहीत करून घेतलं जाऊ शकतं की, तुमचं किती नुकसान झालं आहे? आणि त्याचे काय साइड इफेक्ट्स होऊ शकतात? जेणेकरून वेळेवर रूग्णावर उपचार करून त्यांचा जीव वाचवता येईल.

resize 16206308652113736110821084bloodtest1 202105613905

एंटीबॉडी टेस्ट –

कोणत्याही आजारातून रिकव्हर झाल्यावर आपलं शरीर एंटीबॉडी प्रोड्यूस करतं. जे भविष्यात आपल्याला संक्रमणापासून वाचवण्याचं काम करतात. एंटीबॉडीचं प्रमाण आपल्या शरीरात जेवढं जास्त असतं, आपलं इम्यून सिस्टीम तेवढंच सेफ असतं. सामान्यपणे मानवी शरीर १ ते २ आठवड्यात एंटीबॉडी तयार करतं. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, कोरोनातून रिकव्हर झाल्यावर २ आठवड्यांनंतर igG टेस्ट करण्याचा सल्ला देतात.

blood tets 202105613907

कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट –

या टेस्टच्या माध्यमातून मानवी शरीरातील वेगवेगळ्या सेल्सची टेस्ट केली जाते. याने रूग्णाला याचा अंदाज येतो की, कोरोना संक्रमणाविरोधात त्यांचं शरीर कशाप्रकारे प्रतिक्रिया देत आहे. कोरोनातून रिकव्हरीनंतर रूग्णांनी ही टेस्ट करणं गरजेचं आहे.

glucose 202105613910

ग्लूकोज, कोलेस्ट्रॉल टेस्ट –

डॉक्टरांनुसार, कोरोना व्हायरस आपल्या शरीरात इन्फ्लेमशन आणि क्लॉटिंगची समस्या निर्माण करू शकतात. हेच कारण आहे की, रूग्णांमध्ये ब्लड ग्लुकोज आणि ब्लड प्रेशर लेव्हलमध्ये मोठा चढ-उतारर बघायला मिळतो. अशात तुम्ही सर्वातआधी डायबिटीस, कोलेस्ट्रॉल आणि कार्डियकशी संबंधित कोणती समस्या असेल तर रिकव्हरीनंतर रूटीन टेस्ट नक्की करा.

resize 16206309651384835193821086neurotest1 202105613911

न्यूरो फंक्शन टेस्ट

कोरोनातून रिकव्हरी झालेल्या रूग्णांमध्ये जर ब्रेन फॉग, एन्जायटी, थरथरणे आणि बेशुद्ध होणे अशा समस्या असेल तर त्यांना रिकव्हरीच्या एक आठवड्यानंतर ब्रेन आणि न्यूरोलॉजिकल फंक्शन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जात आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत