Corn Sandwich recipe

Corn Sandwich recipe

Corn Sandwich recipe

रोज पोहे, उपमा तेच तेच खाऊन घरातली मंडळी कंटाळलेली असतात म्हणूच आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी परफेक्ट, कमी कमी वेळात होणारी एक भन्नाट रेसेपी सांगणार आहोत. ब्रेड आणि मक्याच्या दाण्याचा वापर करून तुम्ही मस्त कॉर्न सॅण्डविच तयार करू शकता.

IMG 9973

साहित्य

4 ब्रेड स्लाइस , 1 वाटी कॉर्न उकडलेले , 1 बारिक चिरलेली शिमला मिरची ,1 मिडीयम बारिक चिरलेला कांदा ,1 चीझ क्यूब बाारिक किसलेले , चवीपूरतं मीठ , 1/2 टीस्पून काळी मिरी पूड , 3 टीस्पून पुदीना चटणी ब्रेडला लावण्यासाठी , ऑर्गेनो किंवा मिक्स हर्ब्स , बटर.

कृती

सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये कॉर्न, शिमला मिरची,कांदा, चीज, मीठ, काळीमिरी, ऑर्गेनो हे सर्व साहित्य घालून मिश्रण तयार करून घ्या.

त्यानंतर ब्रेड स्लाइसला पुदीना चटणी लावून घ्या. चटणी लावून झाल्यानंतर ब्रेडवर तयार केलेलं मिश्रण भरुन घ्या. मग वरुन दोन्ही बाजूंना बटर लाऊन टोस्ट करून घ्या. आता आपलं सॅण्डविच खाण्यासाठी तयार आहे.

सॅण्डविच तयार करण्यासाठी ओवन किंवा टोस्टर तुमच्याकडे नसेल तर तव्यातही करु शकता.

तुम्ही हे सॅण्डविच टोमॅटो सॉस किंवा चटणीसह खाऊ शकता. पुदिन्याची चटणी लावण्याआधी तुम्ही ब्रेडवर तुमच्या आवडीच्या फ्लेवरचे चिझ स्प्रेडही लावू शकता. आवडीनुसार बारीक शेव सॅण्डविचमध्ये सजावटीकरीता वापरू शकता

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत