चिरनेर जि.प. विभागाच्या उपतालुकासंघटक पदी रुपेश पाटील व चिरनेर पंचायत समिती गणाच्या विभागप्रमुख पदी अनंत पाटील यांची नियुक्ती

चिरनेर जि.प. विभागाच्या उपतालुकासंघटक पदी रुपेश पाटील व चिरनेर पंचायत समिती गणाच्या विभागप्रमुख पदी अनंत पाटील यांची नियुक्ती

Chirner G. p Rupesh Patil appointed as sub-taluka constituent of the department and Anant Patil as head of the department of Chirner Panchayat Samiti

  • विठ्ठल ममताबादे

उरण – हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख मा. आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी,रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार चिरनेर जि.प. विभागाच्या उपतालुकासंघटक पदी रुपेश पाटील यांची व चिरनेर पंचायत समिती गणाच्या विभागप्रमुख पदी अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांनी जाहीर केले.

‘आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे’, अशा शुभेच्छा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका संपर्क प्रमुख जे.पी. म्हात्रे, तालुका संघटक बी.एन.डाकी, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका भावना म्हात्रे, उरण पंचायत समितीचे माजीसभापती भास्कर मोकळ, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, महिला विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत