वाढदिवस अवयवदात्याचा…

वाढदिवस अवयवदात्याचा…

वाढदिवस अवयवदात्याचा…

वाढदिवस तुमचा..आनंद सर्वांचा..! या प्रभातच्या उपक्रमात अनेकांनी आपल्या मुला-मुलीचा वाढदिवस साजरा केला परंतु आज तीन वर्षांपूर्वी निधन झालेल्या आपल्या मुलाचा वाढदिवस त्याच्या वडिलांनी साजरा केला. त्या वडिलांचे नाव तुकाराम लोखंडे.

तुकाराम हे नाका कामगार मुकादम म्हणून काम करतात तर त्यांच्या पत्नी तुर्भे येथे फुटपाथवर कांदे-बटाटे विक्रीचा व्यवसाय करतात अशाप्रकारे हातावरचे पोट असणारे हे कामगार दाम्पत्य तुर्भे येथील झोपडपट्टीमध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहतात. त्यांचा मुलगा नागेश लोखंडे तीन वर्षांपूर्वी अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रॅण्डेड झाला. त्यानंतर या परिवाराने आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या काळजाचा तुकडा असणाऱ्या नागेशच्या आठ अवयवांचे दान केले अशाप्रकारे मृत्युपश्चातही अवयवदानाच्या माध्यमातून आठ जणांचे जीव वाचविण्याचे महान कर्तव्य या परिवाराने पार पाडले ही गोष्ट इथेच संपत नाही आपला मुलगा या आठ जीवांच्या माध्यमातून आजही आपल्या मध्ये आहे ही सदभावना या परिवाराने आजही जपली आहे. यासाठीच सामाजिक भावनेतून नागेशचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुकाराम लोखंडे आज स्वतः प्रभात ट्रस्टच्या सौर उर्जेवर आधारित जगातील पहिल्या फिरत्या नेत्रालयाद्वारे मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप या उपक्रमात सहभागी झाले.

WhatsApp Image 2021 07 23 at 4.46.27 PM

आज गुरुपौर्णिमा. गुरूकडून मिळालेली शिकवण आपण आत्मसात करतो. आज तुकाराम लोखंडे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेली शिकवण आपण सर्वांनी आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. तरच प्रतीक्षा यादीत वर्षानुवर्ष असणाऱ्या रुग्णांना अवयव प्रत्यारोपण करणे शक्य होणार आहे. चला तर मग आपणही अवयवदानाचा संकल्प करूया आणि प्रभातच्या माध्यमातून अवयवदान दूत बनवूया.

WhatsApp Image 2021 07 23 at 4.46.28 PM

डॉ. प्रशांत भा. थोरात – नेत्ररोग तज्ञ
अध्यक्ष, प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई
9869432224
[email protected]

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत