२२ जुलै १९४७ रोजी भारतीय राष्ट्रध्वजावर अशोकचक्र प्रस्थापित केले गेले

२२ जुलै १९४७ रोजी भारतीय राष्ट्रध्वजावर अशोकचक्र प्रस्थापित केले गेले

Ashokchakra was established on the Indian national flag on July 22, 1947

अशोकचक्र म्हणजे ‘धम्माने प्रेरित असलेल्या सदाचरणाचे चक्र.’ सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते. या चक्राला २४ आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोकचक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोकस्तंभ, हे समजले जातात. आता हे अशोकचक्र प्रामुख्याने भारतीय बौद्ध ध्वजात (निळा भीम ध्वज) आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी विराजमान झालेले दिसते, जे २२ जुलै १९४७ रोजी स्विकारले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय प्रसिद्ध बौद्ध विद्वान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. पांढऱ्या रंगाच्या पाश्वभूमीवर हे गडद निळ्या रंगाचे चर्र खूप उठावदार दिसते.

भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे चार सिंहाचे प्रतीक स्वीकारले गेले आहे, त्याला आधार देणाऱ्या दहडावरही मध्यभागी अशोक चक्र कोरलेले आहे.आपल्या राज्यकारभाराच्या काळात सम्राट अशोकांनी या चक्राची निर्मीती केली. ‘चक्र’ हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘स्वतःभोवती स्वतःगोल फिरणारा’ असा होतो. ही गोल फिरण्याची क्रिया ‘समयचक्र’ दर्शवते. म्हणजे काळाबरोबर जग कसे बदलत राहते ती क्रिया दाखवण्यासाठी चक्राचे उदाहरण दिले जाते. घोडा हे अचूकता आणि वेग यांचे प्रतीक आहे, तर बैल हा कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत