अक्षय कुमारचा “बेल बॉटम” चित्रपट लवकरच चित्रपटगृहात होणार प्रदर्शित !

अक्षय कुमारचा “बेल बॉटम” चित्रपट लवकरच चित्रपटगृहात होणार प्रदर्शित !

Akshay Kumar's "Bell Bottom" to hit theaters soon!

कोरोना महामारीचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. अशात चित्रपट सृष्टीचे ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. टाळेबंदी मुळे चित्रपटगृह बंद असल्याने अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करण्यात आले. यामध्ये जास्त बजेट असलेल्या चित्रपटांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील ५०% क्षमतेने चित्रपटगृह खुली करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशात अक्षय कुमारचा आगामी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जाते.

bell


अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी त्याचा “बेल बॉटम” हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं होत. महाराष्ट्रातील काही प्रमुख व्यक्तींपैकी एका व्यक्तीने “दिल्ली सरकारने ५०% क्षमतेने चित्रपटगृह सुरु करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे स्वागत आहे. आम्ही अशी आशा करतो की, महाराष्ट्रातील चित्रपटगृह देखील लवकरच सुरु होतील. राज्यातील चित्रपटगृहांना निदान रोजची त्यांची भाकरी कमवण्याचा अधिकार आहे.” असं म्हटलं आहे.

bell bottom 1580124307


त्यामुळे महाराष्ट्रात दिल्ली सरकारप्रमाणे ५०% क्षमतेने चित्रपटगृह सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला गेला तर रुपेरी पडद्यावर सर्वप्रथम अक्षय कुमारचा “बेल बॉटम” झळकू शकतो. अक्षयकुमारने देखील स्वतः त्याचा आगामी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं होत. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी “बेल बॉटम” रुपेरी पडद्यावर झळकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमारचा एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झेलला नाही. त्यामुळे आता “बेल बॉटम” चित्रपटगृहात प्रदर्शित होईल याची उत्सुकता अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये पहायला मिळतेय.

rajexpress 2020 10 72297b58 9f35 4cf5 8487 15d7d5f766db AkshayKumar sretrocoolin BellBottom teaser 1


अक्षय कुमारने आता पर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपट केले आहेत. यामध्ये त्याचे शेवटचे गुडन्युज व हाऊसफुल फोर या चित्रपटांना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली. आणि हे चित्रपट हिट झाले. कोरोना महामारीमधला अक्षय कुमारचा “बेल बॉटम” हा पहिलाच चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट देखील किती हिट जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत