डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही- शास्त्रज्ञ डॉ. अनुराग अग्रवाल

डेल्टा प्लसमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता नाही- शास्त्रज्ञ डॉ. अनुराग अग्रवाल

A third wave is unlikely due to Delta Plus - scientist Dr. Anurag Agarwal

नवी दिल्ली- कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाट येण्याबदल सगळ्यांच्या मनात भीतीचे वातावरण दिसून येत आहे परंतु इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी)चे संचालक व प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले कि कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस या प्रकारामुळे देशात तिसरी लाट येण्याची शक्यता नाही.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बदल सांगताना डॉ. अग्रवाल म्हणाले की, तिसरी लाट येण्याबद्दल अजून तरी काही पुरावे उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रामध्ये डेल्टा विषाणू शोधण्याकरिता एप्रिल-मे महिन्यापासून कोरोना विषाणूचे ३५०० नमुने गोळा करण्यात आले असून त्यांच्या तपासणीमध्ये डेल्टा प्लस विषाणू आढळले पण त्यांची संख्याप्रमाण अगदीच नगण्य होते.
आयजीआयबी चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी सांगितले, महाराष्ट्रातून कोरोनाचे नमुने गोळा करण्यासाठी व त्याच्या सखोल अभ्यासाकरिता आयजीआयबीने महाराष्ट्रशी विशेष करार केला आहे. आयजीआयबी संस्थाप्रमाणेच इन्सोकॉग या संस्थामार्फत ४५ हजार डेल्टा विषाणूंचे नमुने गोळा करून त्यांचे अस्तित्व शोधण्याची शक्यता आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने कोरोना स्थिती उत्तमरीत्या हाताळलेले आहे. अजून कोरोनाची दुसरी लाट सरलेली नाही. रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे बेसावध न राहता आपण नियमाचे पालन केले पाहिज.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत