“७ लाख देऊन थायलँडवरून कॉलगर्लला बोलावलं अन्” भाजपा खासदारावर सपाचा गंभीर आरोप

“७ लाख देऊन थायलँडवरून कॉलगर्लला बोलावलं अन्” भाजपा खासदारावर सपाचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका व्यापाऱ्याने ७ लाख खर्च करून थायलँडवरून कॉलगर्ल बोलवल्याची बातमी समोर आली होती.

लखनौ – कोरोना महामारीनं जगातील अनेक देशात हाहाकार माजला आहे. यातच उत्तर प्रदेशात थायलँडवरून आलेल्या एका युवतीच्या मृत्यूनं खळबळ माजली आहे. १० दिवसांपूर्वी मृत युवतीला ७ लाख रुपये देऊन थायलँडवरून बोलवलं होतं. आता समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी भाजपाचेराज्यसभा खासदार संजय सेठच्या मुलाने या युवतीला मौजमज्जा करण्यासाठी बोलवल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास लखनौ पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका व्यापाऱ्याने ७ लाख खर्च करून थायलँडवरून कॉलगर्ल बोलवल्याची बातमी समोर आली होती. १० दिवसांपूर्वी या कॉलगर्लला लखनौला बोलावलं. त्यानंतर २ दिवसांत ती कोरोना संक्रमणामुळे आजारी पडली. याची माहिती व्यावसायिकाने थायलँड एम्बेसीला दिली. त्यानंतर एम्बेसीच्या हस्तक्षेपानंतर कॉल गर्लला राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु ३ मे रोजी तिचा मृत्यू झाला.

कॉलगर्लच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत चौकशीला सुरूवात केली आहे. हे प्रकरण समोर येताच यूपीच्या राजधानीत पुन्हा आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. थायलँडवरून भारतात आल्यानंतर या कॉलगर्लच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याच दरम्यान समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी आरोप केलाय की, थायलँडवरून कॉलगर्ल बोलवणारा दुसरा तिसरा कोणी नसून भाजपाचे राज्यसभा खासदार संजय सेठ यांचा मुलगा आहे. त्याचसोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर करत म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला उभे असणाऱ्या भाजपा खासदार संजय सेठवर गंभीर आरोप आहे. जगभरात महामारी सुरू असताना थायलँडवरून कॉलगर्ल बोलावली आता तिचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये हिंमत आहे का याची चौकशी करण्याची? असं आवाहन त्यांनी केलं आहे.

त्याचसोबत लखनौ पोलीस या प्रकरणावर अधिकृत भाष्य का करत नाही? कॉलगर्लच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम कुठे आहे? शिवम कुक कोण आहे. ज्याला मृतदेह हाताळायला सांगितला. त्याच्या जीवालाही धोका आहे. राकेश शर्मा स्थानिक हँडलर कुठे गायब आहे. एजेंट सलमानही बेपत्ता आहे असा आरोपही आय. पी सिंह यांनी केला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत