२ दिवस मृतदेहावर उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळणाऱ्या डॉक्टरला अटक

२ दिवस मृतदेहावर उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळणाऱ्या डॉक्टरला अटक

Doctor arrested for treating body for 2 days and extorting money from relatives

इस्लामपूरमधील धक्कादायक प्रकार !

नवी मुंबई- रुग्णाचे प्राण वाचवणे, त्यांच्यवर उपचार करून बरे करणे हे डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य असते. यासाठी त्यांना मानवीरुपी देव समजले जाते. मात्र काही नराधमांमुळे डॉक्टर या पेशाला काळिमा फसला जात आहे. असाच काही प्रकार सांगलीमधील इस्लामपूर येथे घडला आहे. रुग्णाचा मृत्यू दोन दिवसांपूर्वीच झालेला असतानाही मृतदेह दडवून त्यावर उपचार सुरू असल्याचे भासवत नातेवाइकांना लुबाडण्याचा प्रकार एका डॉक्टरने केला असून या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. योगेश वाठारकर असे या डॉक्टरचे नाव असून याला कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इस्लामपूरमधील आधार हेल्थ केअर असे रुग्णालयाचे नाव असून या रुग्णालयाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासेगाव येथील रुग्ण सायरा शेख (वय ६०) यांना मेंदू पक्षाघातावरील उपचारासाठी २४ फेब्रुवारीला इस्लामपूर येथील या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागला. यातच त्यांचा उपचारादरम्यान ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी मृत्यू झाला. मात्र नातेवाइकांना त्यांच्या मृत्यूची माहिती १० मार्च रोजी रुग्णालयाकडून देण्यात आली. मात्र यावेळी या महिलेवर उपचार सुरूच ठेवण्यात आले होते. या दोन दिवसाच्या कालावधीत नातेवाइकांकडून रुग्णालयाने ४१ हजार २८९ रुपये देखील वसूल केले होते.

यानंतर मृत महिलेचा मृत्यू दाखला आणण्यासाठी त्यांचा मुलगा सलीम शेख नगरपालिकेत गेले असता त्या ठिकाणी मृत्यूची तारीख ८ मार्च असल्याचे समजल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल मागविला. या अहवालामध्ये प्रत्यक्षात मृत्यूची वेळ आणि रुग्णालयातून सांगण्यात आलेली वेळ यामध्ये ४८ तासांचे अंतर असल्याचे आढळून आले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत