हेल्दी स्मूदी सध्या ट्रेंडमध्ये; पहा याची रेसिपी

हेल्दी स्मूदी सध्या ट्रेंडमध्ये; पहा याची रेसिपी

recepie of healthy smoothy

सध्या स्मूदी या नावाचे पेय खूपच ट्रेंडिंग आहे. लोक निरोगी जीवनशैलीकडे वळत असल्यानेच स्मूदी या प्रकाराबाबत सर्वत्र चर्चा आहे. मिल्कशेक पिऊन लोकांना कंटाळा आला की ते स्मूदीकडे वळतात. स्मूदी आणि मिल्कशेकमध्ये फरक असा की, नेहमीच्या मिल्खशेकमध्ये एखाद फळ आणि दूध वापरले जातात. तर स्मूदीमध्ये फळ, दूध यासोबतच भाज्या, दही, ड्रायफ्रुट्स, मध, बदामाच दुध असे सर्व पदार्थ वापरले जातात. तसेच तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने देखील स्मूदी बनवू शकता. त्याचप्रमाणे हे स्मूदी पेय पावसाळ्यामध्ये अगदी आरोग्यदायी व पोषक असते.

हेल्दी स्मूदी कशी बनवायची ?

स्मूदी रेसिपी बनवण्यसाठी खालील दिलेले साहित्य एकत्र करून ३० सेकंद ते १ मिनिटांपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मिश्रणाला स्मूद टेक्शर आल्यावर तुमची स्मूदी तयार होते. ज्यांना जास्त गोड स्मूदी आवडते ते या स्मूदीमध्ये मधाचा वापर करू शकतात. स्मूदी वरून ड्रायफ्रुट्स किंवा भोपळ्याच्या बियांनी सजविले तर स्मूदी आणखी आकर्षक दिसते.

१.स्ट्रॉबेरी बनाना स्मूदी
१ केळ, १ किंवा १/२ कप – स्ट्रॉबेर, १ टेबल स्पून – चिया सीड्स, ३/४ कप – बदाम दूध

२. ऑरेंज कॅरेट जिंजर स्मूदी
१ केळ, १ कप ताज्या संत्र्याच्या फोडी, १/३ कप – किसलेले गाजर, १/२ टी- स्पून – ताजे किसलेले आले, १/२ कप – बदाम दूध किंवा रेग्युलर दूध
१ – २ बर्फाचे तुकडे (पर्यायी)

३. मंगो-पाइनॅपल स्मूदी
१ केळ, १ कप आंब्याचे तुकडे, १ कप अननसाचे तुकडे, १ टेबल स्पून चिया सीड्स, १ कप दूध

४. एवोकॅडो-कुकुंबर स्मूदी (ग्रीन स्मूदी)
१ केळ, १/२ कप – काकडीचे तुकडे, १ मध्यम आकाराचा एवोकॅडो, १ – २ बर्फाचे तुकडे (पर्यायी)

५. चेरी-बीट स्मूदी
१ केळ, १ कप चेरी, १/२ कप – उकडलेले बीट, १/४ कप – ओट्स, ३/४ कप – दूध

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत