हिंद मराठी आयोजित काव्यगंध स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतासह विदेशातुन ही मिळाला सहभाग

हिंद मराठी आयोजित काव्यगंध स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतासह विदेशातुन ही मिळाला सहभाग

हिंद-मराठी चॅनलतर्फे संपुर्ण जगातल्या नवकवींसाठी ‘काव्यगंध’ स्वरचित काव्यसादरीकरण स्पर्धा ही स्पर्धा शनिवारी २६ जून २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख २० जुलै असल्यामुळे सर्व स्पर्धकांनी वेळेच्या आत व्हिडिओ देऊन उत्तम प्रतिसाद दिला. तसेच या स्पर्धेमध्ये भरतातूनच नाही तर, फ्रान्स, ऑस्ट्रेलियातूनही स्पर्धकांचा सहभाग असल्याने ही स्पर्धा अधिकच आकर्षक झाली. ‘काव्यगंध’ या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारत देशातून ऐकून ११८ स्पर्धकांचा सहभाग लाभला असून, दिनांक ३० जुलै रोजी सगळ्या व्हिडिओ प्रेक्षकपसंती साठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्या.
त्याचबरोबर ‘काव्यगंध’ या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण वरिष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. रमेश यादव आणि प्रसिद्ध साहित्यिका डॉ पल्लवी बनसोडे-परुळेकर यांद्वारे केले गेले. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अक्षय कोथींबीरे (पुणे) व ऋतिक शेजोळे (पालघर) यांनी पटकावले असून, द्वितीय पारितोषिक कल्याणी आडत (कर्नाटक) व गौरी म्हसे (ठाणे) आणि तृतीय पारितोषिक कस्तुरी देशपांडे (ऑस्ट्रेलिया) व मानसी पवार (मुंबई) यांनी पटकावले आहे. दरम्यान ‘काव्यगंध’ या स्पर्धेचा एक अनोखा पुरस्कार देखील यामध्ये समाविष्ट केला होता तो म्हणजे, प्रेक्षकपसंती पुरस्कार. या पुरस्काराचे विजेते नवी मुंबईतील गौरव वाघोले आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेतून २० उत्तेजनार्थ काढण्यात आले. काव्यगंध स्पर्धा ही उत्कृष्टपणे पार पडली सोबतच अशाच नवनवीन स्पर्धा आम्ही कवींसाठी घेऊन येऊ असे आवाहन हिंद-मराठीच्या संपूर्ण टीमने केले आहे.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत