हरलीन देओलचा अप्रतिम क्षेत्र रक्षणाचा नजरा

हरलीन देओलचा अप्रतिम क्षेत्र रक्षणाचा नजरा

Harleen Deol's superb field defense look

WhatsApp Image 2021 07 10 at 10.34.44 AM 1

ENG-W vs IND-W 1st T20 Harleen Deol : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात महिला टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात महिला टीम इंडियाला पराभव जरी स्वीकारावा लागला असला तरी संघाच्या क्षेत्ररक्षणामुळं मात्र खेळाडूंनी चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यातल्या हरलीन देओलनं घेतलेल्या भन्नाट कॅचची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अ‍ॅमी एलेन जोन्सनचा हरलीननं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ (Harleen Deol Catch Video) जोरदार व्हायरल झालाय. शिखा पांड्येच्या गोलंदाजीवर अ‍ॅमी एलेन जोन्सननं जोरदार फटका मारला. हा चेंडू सीमापार जाणार असं वाटत असतानाच तिथं चपळाईनं पोहोचलेल्या हरलीन देओलने अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजरा दाखवत अफलातून झेल पकडला. हवेत सूर मारुन तिनं पकडलेला हा कॅच चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत