स्वर्गीय मधुकर ठाकूर सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व – महेंद्र घरत

स्वर्गीय मधुकर ठाकूर सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व – महेंद्र घरत

स्वर्गीय मधुकर ठाकूर सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व - महेंद्र घरत

  • विठ्ठल ममताबादे

उरण – दिवंगत नेते, उरण पनवेल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वर्गीय मधुकर शेठ ठाकूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उरण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच सर्व सेलच्या वतीने शोक सभा उरण काँग्रेस कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.या शोकसभेत स्वर्गीय मधुकरशेठ ठाकूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय इंटकचे सचिव, महाराष्ट्र प्रदेश इंटक चे कार्याध्यक्ष व रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेंद्र शेठ घरत, रायगड जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्ते मिलिंद पाडगांवकर,रायगड जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, उरण विधानसभा प्रभारी अकलक शिलोत्री, कोकण मच्छीमार संघाचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, उरण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरीट पाटील, उरण शहर महिला काँग्रेस अध्यक्ष अफशा मुकरी, उरण शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील,विभागीय अध्यक्ष उमेश ठाकूर,ज्येष्ठ नेते हेमंत पाटील, सेवादल शहराध्यक्ष शैलेश तामगाडगे व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या जीवन यात्रेवर व पक्ष निष्ठेवर कामगार नेते महेंद्र घरत म्हणाले की मधुकर ठाकूर साहेब हे सर्व सामान्य जनतेचे नेते होते. त्यांनी नेहमीच गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात जिल्हा परिषद सद्स्या पासुन केली होती.सतत जनतेच्या संपर्कात असणारे नेते म्हणून अलिबाग तालुका आणि रायगड जिल्ह्यात त्यांची ओळख होती.रात्री आप रात्री ते कार्यकर्त्यांचे फोन घेत असत व त्यांच्या अडचणी समजुन ते लोकांची कामे करत असत.

WhatsApp Image 2021 07 20 at 3.29.22 PM

त्यामुले ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. याचे मूर्तिमंत उदाहरण द्यायचे झाले तर अलिबाग-उरण विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाची मक्तेदारी होती ही मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी अलिबाग -उरण मतदार संघातून निवडून येण्याची किमया साधली. हा त्यांच्या कार्याचा खरा विजय होता. व या मतदार संघातून निवडून येण्याचा चमत्कार देखील त्यांनी केला.सतत लोकांच्यात राहुन त्यांच्या हाकेला धाऊन जाऊन ते प्रश्न तडीस नेणे व सर्वसामान्य जनतेला न्याय देत ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत झटत राहिले.व काँग्रेस पक्षाशी ते एकनिष्ठ राहिले.त्यांची ओळख हि काँग्रेस कार्यकर्ता ते नेता अशी होती.त्याचं राहणीमान हे अत्यंत साधेपणाचे होते. त्यांच्या बोलण्यात कुठलाच अविर्भाव नसायचा.सर्वांशी ते प्रेमाने वागायचे. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्यात काँग्रेसची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.अश्या या महान नेत्याला माझ्या काँग्रेस पक्षाकडून, राष्ट्रीय इंटक कडून व माझ्या परिवाराकडून भावपुर्ण आदरांजली वाहत आहे.यावेळी उपस्थित मिलिंद पाडगांवकर , महेंद्र ठाकूर , अकलक शिलोत्री, किरीट पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत