“स्वयम् च्या ठाणे शाखेचे उद्घाटन जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात संपन्न”

“स्वयम् च्या  ठाणे शाखेचे उद्घाटन जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात संपन्न”

"Inauguration of our own Thane branch at Joshi-Bedekar Autonomous College"

नवी मुंबई- भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या वतीने ऑनलाईन शिक्षण सर्वदूर पोहोचवण्यासाठी स्वयम् नावाचे पोर्टल कार्यरत असून त्याच्या ठाणे शाखेचे उद्घाटन विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर स्वायत्त महाविद्यालयात दि.17 जुलै 2021 रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ विजय बेडेकर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक यांनी स्वयम् या शैक्षणिक व्यासपीठा चा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे मत व्यक्त केले.
उद्घाटन प्रसंगी विजय बेडेकर म्हणाले की अध्ययन अध्यापनाच्या शतकांच्या इतिहासामध्ये भारताने मोठे योगदान दिले आहे. चार भिंतीच्या पलीकडे जाऊन व साचेबंद अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त कौशल्य विकास व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास आवश्यक असून तो स्वयम् च्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या ऑनलाईन पोर्टल चे त्यांनी स्वागत केले व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित लाभ होईल असे मत व्यक्त केले.

dr v n bedekar institute of management studies vnbrims thane

याप्रसंगी स्वयम् चे समन्वयक डॉ सागर ठक्कर यांनी स्वयम् पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या दहा कोर्सेसची माहिती विद्यार्थी व प्राध्यापकांना करून दिली. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व विद्यार्थी या नवीन अभ्यासक्रमातून लाभान्वित होणार आहेत. सोबतच ठाणे परिसरातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुचित्रा नाईक म्हणाल्या. कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा सुभाष शिंदे, डॉ प्रियंवदा टोकेकर व डॉ महेश पाटील उपस्थित होते.

WhatsApp Image 2021 07 17 at 3.48.42 PM 1

राज्यशास्त्र, मानसशास्त्र, वाणिज्य, व्यक्तिमत्व विकास इत्यादी दहा वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले असून त्यासाठी 200 विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले आहे. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपल्या नियमित कोर्सेस पेक्षा वेगळ्या विषयांचं ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त ठरतील.

या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ झरणा तोलानी यांनी केले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत