स्वभावाला ही औषध असतं

स्वभावाला ही औषध असतं

स्वभावाला ही औषध असतं
फक्त ते रोज घ्यायचं असतं …

10dea276a89b8d657f6729afd28b86b1

अभिमानातला अ काढून, थोडं स्वाभिमानाने जगायचं असतं…
गैरसमजातला गैर काढून, थोडं समजून घ्ययचं असतं …

संतापातला ताप काढून, संतासम मन करायचं असतं …
मनातला हट्ट सोडून, नात्यांना घट्ट करायचं असतं …

आपलं म्हणणं सोडून, समोरच्याचही ऐकून घ्यायचं असतं …
दुसऱ्यावर राग काढण्याआधी, समोरच्याला ही समजून घ्यायचं असतं …

अश्यक्यातला अ काढून, शक्य तितकं करायचं असतं …
अस्त्यातला अ बाजूला सारून, सत्य बोलायला शिकायचं असतं …

एकाच दिवशी नाही तर, रोज थोडं थोडं बदलायचं असतं…
स्वभावाला ही औषध असतं, फक्त ते रोज घ्यायचं असतं …

         - श्रुती दळवी

         - श्रुती दळवी
author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत