स्वच्छ समुद्र निसर्ग वाचवण्यासाठी!

स्वच्छ समुद्र निसर्ग वाचवण्यासाठी!

समुद्र म्हणजे पाण्याचा प्रवाह, जो न थांबता सतत नवीन वाटा शोधत या सजीव सृष्टीला विविधतेने रंगवत आहे. विविध झाडांनी, वनस्पती, जीव सृष्टीला समुद्रातच नवं जग तयार झालंय असं मला वाटतं. या मनुष्य प्राणीच्या आयुष्यात समुद्र किनारा म्हणजे अनेक आठवणींची साठवण आहे असं हि म्हणतां येईल. समुद्र सृष्टीला आपण सगळ्यांनी जपावं त्याचं आयुष्य वाढवावं तसेच त्यातील नैसर्गिक सौंदर्य कायम टिकून रहाव यासाठी जागतिक समुद्र दिवस साजरा केला जातो.

अनेक लोक समुद्र किनारा साफसफाई उपक्रम राबवत होते. गेली दोन वर्षे लॉकडाउनमुळे ऑनलाईन स्पर्धा, प्रदर्शन, कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आपण समुद्र स्वच्छ व निर्मळ असावं यासाठी अनेक उपाययोजना करु शकतो. आपण अनेक वर्षे बघत आलो आहोत कि समुद्रात असंख्य प्रकारचा कचरा आपल्याला पाहायला मिळतात असतं. कागद, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल असे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आपण पाहतच आहोत. काही वर्षांनी समुद्रात मासे नसुन कचरा असेल असा दावा देखिल तज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे आपण समुद्रात असो वा नदीमध्ये कचरा टाकणे थांबवलं पाहिजे. जल प्रदुषण होण्यापासून बचाव केला पाहिजे. जल प्रदुषणामुळे फक्त मनुष्य प्राणीला हानी होते असं नाही तर जल जीव सृष्टीला देखिल मोठी हानी होताना दिसते.

भारतात अनेक सण समुद्र नद्याच्या किनार्यावर साजरा केले जातात त्यामुळे देखिल निसर्गाची हानी होताना आपण पाहतच आहोत.‌ या दिवशी आपण संकल्प करुया कि समुद्र व नद्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. या निसर्गाला अजून फुलू देऊयात.

चैत्राली निंबाळकर
डोंगरी शाळा
मीडिया अकादमी , सलाम बॉम्बे फाऊंडेशन

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत