स्थानिक स्वराज्य संथानच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार – नाना पटोले

स्थानिक स्वराज्य संथानच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार – नाना पटोले

Congress will contest local body elections on its own - Nana Patole

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नाना पाटोले शिवसेना व राष्ट्रवादी विरोधात खोचक विधान करत आहेत. त्यामुळे माविआ चे सरकार टिकणार की नाही अशी चर्चा जोर धरू लागली होती त्यात आता काँग्रेस चे पक्ष प्रमुख राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं नाना पाटोळे यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्यासमवेत नाना पाटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत या तीन नेत्यांमध्ये आगामी निवडणुकी संधर्भात बराच वेळ चर्चा झाली दरम्यान आपण एकट्याने लढण्याचा निर्णय यामध्ये घेणयात आला.

883499 nana patole


नानापाटोलेंनी महाविकास आघाडीवर केलेले आरोप
सध्या महाविकास आघाडीबरोबर सत्तेत असूनही राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कामांवर नानांनी नाराजी व्यक्त केली, लोणावळ्यातील मेळाव्या मध्ये बोलत असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळक ठेवून आहेत आणि आता आम्ही स्वबळाची भाषा केल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल असे आरोप नानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केले होते.
या सर्व खळबळजनक वक्तव्यांवरून माविआ मद्ये आता पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच मंगळवारी काँग्रेसच्या तीन नेत्यांच्या झालेल्या बैठकीबाबत बुधवारी राहुल गांधी यांच्या आदेशानुसार आम्ही स्वबळार आगामी निवडणूक लढवणार असल्याचं काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर माझे फोन कॉल महाराष्ट्र सरकार टॅप करत आहेत व येणाऱ्या आगामी विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांवेळी पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो पक्षातील सर्व जण मानतील . तसेच २०१७-२०१८ मध्ये फोन टॅपिंग करून मध्यप्रदेश व कर्नाटकातील निवडणुकांवेळी वापरण्यात आल्या


आमची गोपनीय माहिती अशा पद्धतीने वापरणे हे संविधानाच्या विरोधात आहे. व यावर आम्ही आवाज उठवणार असून राज्यपालांच्या निवास्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला व सर्वोच्च न्यायालयाकडून याची चौकशी व्हावी तसेच राष्ट्रपतींनी देखील यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणी नाना पाटोले यांनी केली . दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवर बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. केंद्र सरकारने सर्व सुविधा व्यवस्थीत पुरवल्या नाहीत. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसला तरी सध्या लसींचा तुटवडा आहे केंद्राने पाकिस्तानला लसी दिल्या नसत्या तर महाराष्ट्रात लसीकणासंदर्भात ही वेळ आली नसती असे नाना पाटोले म्हणाले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत