स्थानकांवर बस थांबण्यासाठी शिवसेनेचे निवेदन

स्थानकांवर बस थांबण्यासाठी  शिवसेनेचे निवेदन

स्थानकांवर बस थांबण्यासाठी शिवसेनेचे निवेदन

  • विठ्ठल ममताबादे

उरण पनवेल महामार्गावर सिडको कार्यालय जवळील मुख्य रस्त्यावर असलेले पूल (ब्रिज )खराब व धोकादायक झाल्याने ह्या मार्गांवरील वाहनांना दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितले आहे. या धोकादायक पुलामुळे अवजड वाहने तसेच महामंडळच्या प्रवाशी बसेस, नवी मुंबई महानगर पालिकेची सार्वजनिक प्रवाशी बस (NMMT )ह्यांना या मार्गांवर बंदी घालण्यात आलेली आहे.त्यामुळे ह्या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था द्रोणागिरी नोड मधून भेंडखळ मार्गे उरण पनवेल मुख्य रस्ता अश्या पद्धतीने जोडले गेले आहे. नवीन मार्ग असल्याने ह्या मार्गांवर बस थांबेच नाहीत. उरण मधून द्रोणागिरी मार्गे पनवेल, वाशीला जाताना मध्ये कुठेच बस थांबा नसल्याने बस थांबत नाहीत त्यामुळे नोकरदार,व्यापारी, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, स्थानिक नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक ठरत आहे.

बसच थांबत नसल्याने नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेतर्फे शाखाप्रमुख जगजीवन भोईर यांनी उमा इम्पिरिअल इमारत सेक्टर 48, रिद्धी सिद्धी इमारत सेक्टर 50, देवकृपा इमारत सेक्टर 51, MSCEB चौक, हिंदमाता टर्मिनल, भेंडखळ गाव या ठिकाणावर बस थांबा लावण्यात यावेत अशी मागणी महामंडळ बस आगार, NMMT(नवी मुंबई महानगर पालिका )बस प्रशासन, कार्यकारी अभियंता सिडको विभाग यांच्याकडे पत्रव्यवहारा द्वारे केली आहे. सदर ठिकाणावर त्वरित बस थांबा लावण्यात यावेत जेणेकरून चालक, वाहक, प्रवाशांना माहिती मिळेल व सर्वांचाच प्रवास सुखाचा होईल अशी मागणी जगजीवन भोईर यांनी केली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत