स्त्री जन्म आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्षा

स्त्री जन्म आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्षा

आजी म्हणते, उपास – तापास कर, पुजा पाठ कर, नवरा आणि सासर चांगलं भेटेल…

आजोबा म्हणतात, शांत रहा, समजुन घे, सासरी निभवाव लागेल…

आई म्हणते, घरची चार काम शिकून घे, सासरी सोपं जाईल…

मामा म्हणतात,जिन्स नको घालू, टिकली लाव, बांगड्या घाल, सासरं चे नाव ठेवतील…

मामी म्हणते, पटापट चालू नको, जोरात बोलू नको, सासरी असं चालत नसेल…

आत्या म्हणते, डान्स आणि गाणी कशाला? शिवणकाम शिक, सासरी  त्याचा उपयोग होईल…

मावशी म्हणते, सारखं पुस्तक, अभ्यास करू नकोस, चार माणसांत उठ – बस, सासरी हेच कराव लागतं…

पण, बाबा म्हणतात, तुला जसं हवं तस जग, मनमुराद आणि भरभरून, तुला हवं ते घाल, हवं तेवढ शिक, ओरड, खेळ, नाच, फिर आणि मन मोकळेपणाने जग… कारण तु तुझ्या हक्काच्या घरी आहेस, तु तुझ्या माहेरी आहेस…

असं म्हणारे प्रत्येक बाबा जर प्रत्येक घरात असतील तर नक्कीच त्या घरातील मुलगी तिची असलेली स्वप्ने आणि तिचं जग ती तिच्या पद्धतीने जगू शकेल.

तिला जे योग्य वाटतं ते ती तिच्या जीवनात करू शकेल, आणि तिला तिच्या घरात ही, मनमोकळे पणाने राहता येईल…

                                      _ सोनाली मोहन कदम.    

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत